
"Minister Munde Visits Flood-Hit Farms, Pledges Support to Farmers"
Sakal
अशोक चांगले
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी महसुल मंडळासह परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे लखमापुरी शिवारासह अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या संकटाची दखल घेत राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. पंकजाताई मुंडे यांनी नुकतेच शिवारात जाऊन पाहणी केली.