esakal | पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडे उतरल्या रस्त्यावर, परळीत मदत फेरी
sakal

बोलून बातमी शोधा

पंकजा मुंडे

पूरग्रस्तांसाठी पंकजा मुंडे उतरल्या रस्त्यावर, परळीत मदत फेरी

sakal_logo
By
गणेश पिटेकर

परळी (जि.बीड) : भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज गुरुवारी (ता.२९) कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी (Flood In Kokan, West Maharashtra) परळी शहरातून मदत फेरी काढली आहे. यात साधारण ५० हजार रुपयांची निधी जमा झाल्याचे सांगितले जात आहे. आपण पूरग्रस्त भागात जाणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते मदत फेरीत (Parli) सहभागी झाले आहेत. मुंडे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हार, बुके यावर होणारा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. (pankaja munde held relief rally in parli for flood affected people beed news glp88)

हेही वाचा: पतीच्या विरहातून मानसिकरित्या खचलेल्या पत्नीने संपविले जीवन

त्याला प्रतिसाद अनेकांना प्रतिसाद दिले. त्यातून महाड तालुक्यातील तळीये (Taliye) गावात दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील पूरग्रस्त गावकऱ्यांना मदत केल्याचे पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून माहिती दिली आहे.

loading image
go to top