Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत
Beed News: बीडच्या सावरगाव घाट येथे झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की मराठा आरक्षणाला विरोध नाही, मात्र आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका. त्यांनी गोपीनाथ मुंडेंचा वसा व वारसा कधीही न सोडण्याचा निर्धार व्यक्त केला.
बीड : ‘‘हा केवळ मेळावा नाही; तर ऊसतोड, कष्टकरी, संघर्ष करणाऱ्या माणसांच्या विचारांचा, श्रद्धेचा सोहळा आहे. येथे जमलेल्या प्रत्येकाने विचारांचा वारसा घेऊन जायचा आहे. मराठा आरक्षणाला गोपीनाथराव मुंडे यांचाही पाठिंबा होता.