esakal | बीडचे माफियाराज राज्यपालांच्या कोर्टात,मुंडे कोश्‍यारींच्या भेटीला | Pankaja Munde
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde Meet Governor Bhagat Singh Koshyari

बीडचे माफियाराज राज्यपालांच्या कोर्टात,मुंडे कोश्‍यारींच्या भेटीला

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : माफियाराजमुळे जिल्हा वरचेवर बदनाम होत आहे. दोनच दिवसांपूर्वी चक्क पोलिस अधीक्षक कार्यालसमोर तलवारीने मारहाण झाली आहे. आता जिल्ह्यातील माफियागीरीचा मुद्दा राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या कोर्टात पोचला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी श्री. कोश्‍यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. मराठवाड्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. जिल्ह्यातील महिलांवरील वाढते अत्याचार, अवैध वाळू उपसा, खुन, दरोडे अशा घटनांनी धुमाकुळ घातला आहे. यापूर्वीही पंकजा मुंडे यांनी हा मुद्दा निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे पोचविला होता. दोन दिवसांपूर्वीही त्यांनी जिल्ह्यातील माफियाराजला सत्तेतल्या लोकांचे पाठबळ (Beed) असल्याचा गंभीर आरोप केला होता. आता त्यांनी थेट राज्यपालांकडे धाव घेतली आहे. अतिवृष्टीने बीडसह मराठवाडयातील (Heavy Rain In Marathwada) सर्वच जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

हेही वाचा: महाविकास आघाडीच्या बंदला औरंगाबादेत संमिश्र प्रतिसाद

अतिवृष्टीत काढणीला आलेली पिके संपूर्ण उद्ध्वस्त झाली असून जमिनीची माती वाहून गेली आहे. अनेकांना प्राण गमवावा लागला आहे. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अशा कठीण काळात शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहण्याची गरज असल्याने त्यांना तातडीने नुकसान भरपाई जाहीर करावी. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा मंजूर करावा अशी मागणी यावेळी पंकजा मुंडे यांनी केली. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनात मोठी वाढ झाली असून कायदा व सुव्यवस्था पुर्णतः ढासळली आहे. कायद्याचा कसलाही धाक गुन्हेगारांना राहिला नाही. माफियांचे वर्चस्व दिवसेंदिवस वाढत आहे. हा माफिया राज बंद करावा असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

loading image
go to top