'पंकजा मुंडेंना सापत्न वागणूक, फडणवीस अन् पाटील उपहासात्मक बोलून हिणवतात ' | Pankaja Munde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja Munde, Devendra Fadnavis And Chandrakant Patil

'पंकजा मुंडेंना सापत्न वागणूक, फडणवीस अन् पाटील उपहासात्मक बोलून हिणवतात '

औरंगाबाद : २०१९ मध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना सापत्न आणि आकसाच्या भावनेतून वागणूक देण्यात येत आहे. यामुळे विधान परिषदा, राज्यसभा, मंत्रिमंडळातील फेरबदल यामध्ये भाजपचे नेतृत्व त्यांना टाळत आले आहे, असा आरोप भटके, विमुक्त, संघर्ष कृती समितीचे (माधवबन) अध्यक्ष प्राचार्य डॉ. खुशाल मुंढे यांनी केला. औरंगाबाद (Aurangabad) येथे रविवारी (ता.१९) पत्रकार परिषदेत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारतर्फे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी आवश्‍यक असलेल्या इम्पेरियकल डाटासाठी ओबीसीची जनगणना करीत आहे. हे करताना गावात, वाडी वस्ती, सोसायटीत जात मतदार यादीतून आडनावावरून ही जनगणना करण्यात येत आहे. ही जनगणना खरी ठरणार नाही. या प्रकाराचा तीव्र निषेध करीत, तात्काळ डाटा गोळा करणारे कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण देत डाटा गोळा कराव्यात. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करावीत अशी मागणी मुंढे यांनी केले. (Pankaja Munde Not Get Fair Treatment In BJP, Fadnavis And Patil Speak Joking Manner)

हेही वाचा: आय लव्ह यू जिंदगी ! असे स्टेट्स ठेवून विद्यार्थ्याने केली आत्महत्या

मुंढे म्हणाले की, केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केल्यानंतर कोणत्या समाजाला आरक्षण दिल गेलं होते.आरक्षण किती टक्क्यात दिले गेले होते. लोकसंख्येच्या प्रमाण हे सर्वांच्या समोर येत योग्य पद्धतीने आरक्षणाची अमंलबजावणी होईल. पत्रकार परिषदेस गुलाबराव गोळवे आणि रविंद्र जायभाये उपस्थित होते.

हेही वाचा: पंकजा मुंडेंनी स्वतःचा पक्ष काढल्यास; खासदार जलिल यांचं मोठं विधान

पंकजा मुंडे यांनी मौन सोडत भुमिका स्पष्ट करावी

२०१९ मध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांना सापत्न आणि आकसाच्या भावनेतून वागणूक देण्यात येत आहे. यामुळे विधान परिषदा, राज्यसभा, मंत्रिमंडळातील फेरबदल यामध्ये भाजपचे नेतृत्व त्यांना टाळत आले आहे. उमेदवारीची त्यांनी कधी मागणीही केली नाही. पंकजाताई फार मोठ्या नेत्या आहेत, असे बोलून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavi) आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे उपहासात्मक बोलून हिणवत आहेत. हे ओबीसी व भटके विमुक्तांच्या लक्षात आले आहे. त्याचे परिणाम आगामी काळात दिसतील. पंकजा मुंडे यांनी गण स्तरापासून ते विभागीयस्तरापर्यंत ओबीसी मेळावे घ्यावेत. आता मौन सोडत भूमिका मांडावेत आम्ही तुमच्या सोबत राहणार, असे आवाहन मुंडे यांना करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसीत फुट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही डॉ. खुशाल मुंढे यांनी केले.

Web Title: Pankaja Munde Not Get Fair Treatment In Bjp Fadnavis And Patil Speak Joking Manner

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top