

Dhananjay Munde: मागच्या अडीच-तीन वर्षांपासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे बहीण-भाऊ दुरावा दूर करुन एकत्रित आलेले आहेत. पक्ष वेगळे असले तरी एकच राजकीय भूमिका घेऊन दोघे चालत आहेत. त्यातच राज्यात अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष भाजपसोबत सत्तेत असल्याने ही राजकीय मैत्री तशी नैसर्गिकच आहे.