
लातूर : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी जिवंतपणीच मला त्यांचा वारस केले आहे. पद, प्रतिष्ठा, जमीन, संपत्तीपेक्षा ‘वारसा’ असल्याने मोठी जबाबदारी आहे. त्याला धक्का लागू देणार नाही. स्वर्गातील वडिलांची मान खाली जाईल, असे वागणार नाही, असे भावोद्गार पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांनी येथे काढले.