esakal | पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी?
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

''घाबरु नका. मुख्यमंत्री माझा भाऊ आहे,'' असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी 
कधीही न केलेल्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्याच्या बातम्या कोण पेरतंय, असा सवाल करत 'मी मुख्यमंत्री व्हायचे म्हणले, तर चुकीचे काय,' असा सवालही त्यांनी केला.

पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण, पण कधी?

sakal_logo
By
दत्ता देशमुख

परळी (जि. बीड) : २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन करणार असल्याचं सांगून, २७ जानेवारीला औरंगाबादला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. तिथूनच पुढे काय करायचे ते करु, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू

लोकनेते गोपीनाथराव मुंडे जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर झालेल्या अभिवादन सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, माजी मंत्री एकनाथ खडसे, बबनराव लोणीकर, अतुल सावे, खासदार डॉ. प्रितम मुंडे, आमदार सुरेश धस, सुरजितसिंह ठाकूर, नमिता मुंदडा, मोनिका राजळे, रमेश आडसकर, रमेश पाकळे आदींसह भाजप नेत्यांची उपस्थिती होती. 

फक्त परळीची नव्हे, आता राज्याची झाले

मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे. हातात मशाल घेऊन फिरणार आहे, असे सांगत आता शेतकऱ्यांसाठी काम करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. आता मी फक्त परळीची नाही, तर राज्याची झाली आहे, असे म्हणत कुठलेही बंधन उरले नसल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. मराठवाडा दुष्काळमुक्त करा, असं आवाहनही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलं. 

घाबरू नका मुख्यमंत्री माझा भाऊ

''ठाकरेजी तुम्ही मराठवाडा दुष्काळमुक्त करा,'' असे आवाहन करत उपस्थितांना ''घाबरु नका. मुख्यमंत्री माझा भाऊ आहे,'' असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कधीही न केलेल्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या वक्तव्याच्या बातम्या कोण पेरतंय, असा सवाल करत 'मी मुख्यमंत्री व्हायचे म्हणले, तर चुकीचे काय,' असा सवालही त्यांनी केला.

खडसेंनी अशी केली फडणविसांची धो-धो धुलाई

मी पक्ष सोडणार नाही, मला सोडायचे असेल तर पक्षाने निर्णय घ्यावा, असे थेट आव्हान देत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे केलेले कौतुक बरेच काही सांगून गेले. याचवेळी त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे स्मारक उभारणीबद्दल आताही बोलणार नाही, हे सूचक वाक्यही त्यांनी उच्चारले. 

loading image
go to top