esakal | परळीच्या पाच महाविद्यालयांत फक्त ६४ प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

college.jpg

परळी येथील चित्र ॲडमिशनला मुदतवाढ आवश्यक

परळीच्या पाच महाविद्यालयांत फक्त ६४ प्रवेश

sakal_logo
By
प्रा. प्रवीण फुटके

परळी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची पदवी प्रवेश प्रक्रियेची अंतिम तारीख गुरुवारी (ता.२०) संपली आहे. दरम्यान, येथील पाच महाविद्यालयांत मिळून फक्त ६४ प्रवेश झाले असून, आणखी १ हजार ७०० प्रवेश होणे बाकी आहेत. हीच गत जिल्हाभरातील महाविद्यालयात आहे. त्यामुळे प्रवेशासाठी मुदत वाढविण्याची गरज आहे.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. परळीत पाच वरिष्ठ महाविद्यालये असून, जिल्ह्यात पन्नासपेक्षा अधिक महाविद्यालये आहेत. परळीतील महाविद्यालयाची प्रथम वर्षासाठी एकूण १ हजार ७६० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. या महाविद्यालयात प्रवेश सुरू झाल्यापासून गुरुवारपर्यंत (ता. २०) एकूण ६४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ९ ऑगस्टपासून संपूर्ण संचारबंदी लागू केली होती. यामुळे प्रवेश होऊ शकले नाहीत.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १८ ऑगस्टपासून संचारबंदीतून सूट दिली. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले; मात्र याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रथम वर्ष, द्वितीय, तृतीय वर्षासाठी गुरुवारपर्यंत प्रवेशास मुदत दिली आहे. या वेळेत विद्यापीठांतर्गत शहरातील महाविद्यालयात फक्त ६४ प्रवेश झाले आहेत. विद्यापीठाने प्रवेशास मुदत वाढ नाही तर १ हजार ७०० विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत संभ्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने प्रथम, द्वितीय वर्षाचा निकाल ऑनलाइन घोषित केला आहे; मात्र अद्यापही तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल घोषित करण्यात आले नाहीत; कारण तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायच्या किंवा नाही यासंदर्भात सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय निर्णय देत नाही. तोपर्यंत या विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेशही होणार नाहीत. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्येही प्रवेशांसदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top