परांडा गायन वादन विद्यालयाचा मराठवाड्यात डंका

प्रकाश काशीद
शुक्रवार, 29 जून 2018

परंडा  : येथील गायन वादन विद्यालयातील १०२ पैकी १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत मराठवाड्यात डंका मिरवला आहे. मुंबईतील अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयानंतर्गत परंडा (जि. उस्मानाबाद) केंद्रात दोन सत्रात चालणाऱ्या तबला, गायन, हार्मोनियम आदी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या  परीक्षेत यश मिळवले. क्रियात्मक परीक्षेमध्ये वाद, गायन सादर केले.

परीक्षेच्या मध्यमा पूर्ण या प्रकारात सौम्या गजानन सोपल हिने २५० पैकी २२० गुण मिळवत विशेष योग्यतामध्ये (प्रथम श्रेणीपेक्षा अधिकची पायरी) यश मिळवले. यामध्ये १५ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ६१ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या संगीत प्रमानपत्रामुळे अधिकच्या गुण वाढीने विद्यार्थ्यांना अकरावी वर्गात प्रवेश घेणे अधिकचे सोपे झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना केंद्राचे हरिदास लिमकर, संगीत विशारद दैवशाला लिमकर यांचे मार्गदर्शन मिळाले.

१८ वर्षात हजारावर विद्यार्थी झाले संगीत विशारद
२००१ पासून शहरात चालणाऱ्या या केंद्रात आजवर एक हजारापेक्षा अधिक विद्यार्थी संगीत विशारद झाले आहेत, अशी माहिती केंद्राचे व्यवस्थापक हरिदास लिमकर यांनी सांगितले. सध्या केंद्रात भूम, वालवड, बार्शी (जि. सोलापूर), अंजनगाव, माढा(जि. सोलापूर) येथील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

Web Title: Paranda Singing Dance Schools in Marathwada