

Dharashiv News 42 Sugarcane Workers Rescued in Paranda After Alleged Exploitation and Assault by Contractors
sakal
परंडा (जि. धाराशिव): कौडगाव आणि डोमगाव (ता. परंडा) शिवारात ऊसतोडणीसाठी आणलेल्या व अंत्यंत हलाखीच्या स्थितीत ठेवलेल्या मजुरांचा छळ, शोषणाचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी ४२ जणांची सुटका केली. आठशे रुपये प्रतिदिन मजुरी देतो, असे आमिष दाखवून राज्यातील विविध भागांतून मजुरांना तालुक्यात आणण्यात आले.