परभणी : सेलू तालूक्यातील ६७ ग्रामपंचायत निवडणूका होणार अटीतटीच्या

विलास शिंदे
Wednesday, 30 December 2020

तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पहिल्या टप्यात होत असल्याने गाव पातळीवरिल पूढार्‍यांचेही राजकारण तापायला चांगलीच सुरूवात झाली.परंतू या निवडणूकांसाठी गावातील तरूणही चांगलेच कामाला लागल्याने गावपातळीवरिल पुढार्‍यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसत आहे.

सेलू ( जिल्हा परभणी ) : तालुक्यात पहिल्या टप्यात ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत.त्यामूळे मतदार संघाचे आजी- माजी आमदार या निवडणूकांसाठी आमने—सामने येणार आहेत.गावातील ग्रामपंचायतीच आमदारकीच्या निवडणूकांसाठी सत्ताकेंद्र असल्यामूळे या निवडणूकांकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पहिल्या टप्यात होत असल्याने गाव पातळीवरिल पूढार्‍यांचेही राजकारण तापायला चांगलीच सुरूवात झाली.परंतू या निवडणूकांसाठी गावातील तरूणही चांगलेच कामाला लागल्याने गावपातळीवरिल पुढार्‍यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसत आहे. तालुक्यात होत असलेल्या ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी ४९ , नागरीकांचा मागास प्रवर्ग २२,अनुसुचीत जाती १० तर अनुसुचीत जमाती प्रवर्गासाठी एक जागा आरक्षित करण्यात आली आहे. ६७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकित तालुक्यात ३१ ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे. या ग्रामपंचायतीसाठी २०५ वार्डातून ५१९ सदस्य निवडले जाणार आहेत. यासाठी (ता. २३)- ११, (ता. २८)- १३७, (ता. २९)- ४५४ या तीन दिवसात एकूण ६०२ इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी ( ता. ३० ) रोजी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस आसल्याने यादिवशी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ वाढवून दिला आहे. तर ( ता. १५ ) जानेवारी- २०२१ रोजी प्रत्येक्ष मतदान होणार आहे.त्यासाठी पॅनल प्रमुख कामाला लागले आहेत.

हेही वाचासशस्त्रसेना ध्वजनिधीस या क्युआर कोडद्वारे देता येईल देणगी- जिल्हाधिकारी डॉ. विपीन -

तालुक्यातीचे माजी आमदार विजय भांबळे व आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांचे वडिल माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे राजकीय भांडणे सर्वश्रूत आहेत. कुठल्याही परिस्थितीत मतदार संघावर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी श्री. बोर्डीकर-श्री. भांबळे पून्हा ग्रामपंयतीच्या निवडणूकीत आमने- सामने येत आहेत. खेडे गावातील मतदारच येणार्‍या आमदारकीसाठी महत्वाचे असल्याने मतदारसंघातील एक- एक ग्रामपंचायत आपल्याच पॅनलला मिळावी यासाठी आजी- माजी आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.

मोठ्या ग्रामपंचायतीकडे लक्ष...

तालुक्यातील सर्वात जास्त असलेल्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायती वालूर या गावात १७, तर देऊळगाव ( गात ) गावात ११ सदस्य संख्या आहे. तर नऊ सदस्य संख्या असलेल्या १८ ग्रामपंचायती तालुक्यात आहेत.या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात याव्यात यासाठी आजी- माजी आमदार तळ ठोकून आहेत.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: 67 Gram Panchayat elections will be held in Selu taluka parbhani news