सशस्त्रसेना ध्वजनिधीस या क्युआर कोडद्वारे देता येईल देणगी- जिल्हाधिकारी डॉ. विपीन 

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 30 December 2020

राज्यात प्रथमच नांदेड जिल्ह्याने क्युआर कोडची निर्मिती करुन हा कोड उपलब्ध केला आहे. सामाजिक संस्था, विविध संघटना, व्यापारी प्रतिष्ठान, महाविद्यालये, शाळा व सामान्य जनता यांनी या क्युआर कोडद्वारे देणगी रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

नांदेड : सशस्त्रसेना ध्वजनिधीस जिल्ह्यातून एक कोटीपेक्षा अधिक देणगी जमा करण्याचा निर्धार केला आहे. देणगीदारांना सशस्त्र सेना ध्वजनिधीस सुलभ पद्धतीने आपले योगदान, देणगी देता यावी यासाठी राज्यात प्रथमच नांदेड जिल्ह्याने क्युआर कोडची निर्मिती करुन हा कोड उपलब्ध केला आहे. सामाजिक संस्था, विविध संघटना, व्यापारी प्रतिष्ठान, महाविद्यालये, शाळा व सामान्य जनता यांनी या क्युआर कोडद्वारे देणगी रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.  

भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले अशा जवानांच्या कुंटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युद्धात अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र सेनादलातून निवृत्त झालेल्या जवानांच्या पूनर्वसनासाठी विविध कल्‍याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्रसेना ध्वजनिधीचा विनियोग केला जातो. अशा या उदात्त कार्यासाठी समाजाकडून सढळ हाताने मदतीची अपेक्षा आहे.

ध्वजनिधीच्या पत्रकांची व क्युआरकोड स्टिकर्सचे सर्व ठिकाणी वाटप

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत सशस्त्रसेना ध्वजनिधीच्या पत्रकांची व क्युआरकोड स्टिकर्सचे सर्व ठिकाणी वाटप करण्यात येत आहेत. सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिलेली संपुर्ण रक्कम आयकर कायदा 1961, कलम 80 जी (5)  (VI)अन्वये करमुक्त आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा संघटक कमलाकर शेटे यांच्या मोबाईल क्रमांक 9403069447 वर संपर्क करावा, असे आवाहन नांदेडचे सैनिक कल्याण अधिकारी तथा परभणीचे निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Donations can be made to the Armed Forces Flag Fund through this QR code Collector Dr vipin nanded news