esakal | परभणी : खरीपासाठी सोयाबीन बियाणे मुबलक; उगवण क्षमता तपासा- आमदार डॉ. राहूल पाटील

बोलून बातमी शोधा

सोयाबीन
परभणी : खरीपासाठी सोयाबीन बियाणे मुबलक; उगवण क्षमता तपासा- आमदार डॉ. राहूल पाटील
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. परभणी तालुक्यात 45 हजार हेक्टर पेरा प्रस्तावित केला आहे. त्यासाठी 33 हजार 750 क्विंटल सोयाबीन बियाणाची गरज भासणार आहे. परंतू गतवर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी 30 हजार क्विंटल बियाणे जतन करून ठेवलेले आहे. त्यामुळे यंदा उगवण क्षमता चांगली असलेले बियाणे शेतकऱ्यांना मिळण्यास अडचण निर्माण होणार नसल्याचे सध्यातरी दिसत आहे.

येणाऱ्या खरीप हंगामात शेतकरी आपल्या घरचे राखून ठेवलेलेच बियाणे उगवण क्षमता तपासून व बिजप्रक्रिया करून पेरणी करतील असा अंदाज आहे. यासाठी कृषी विभागाने विविध माध्यमातून शेतकऱ्यामध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊन ते परभणी तालुक्यात 45 हजार हेक्टर पेरा प्रस्तावित केला आहे. त्यासाठी 75 किलो प्रति हेक्टर प्रमाणे 33 हजार 750 क्विंटल सोयाबीन बियाणाची गरज भासणार आहे. सोयाबीनच्या काढणी आवस्थेपासूनच सोयाबीन बियाणे हाताळणी व जतन करून ठेवणे बाबत जनजागृती केलेली असल्याने शेतकऱ्यांकडे स्वताच्या जवळचे 30 हजार क्विंटल बियाणे जतन करून ठेवलेले आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी जवळपास 110 हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची बियाणे करिता पेरणी केलेली आहे. त्यापासून 1 हजार 500 क्विंटल बियाणे प्राप्त होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा - महावीर व हनुमान जयंती साधेपणाने साजरी करावी- डॉ. विपीन इटनकर

जिल्ह्यात मागील दोन वर्षात ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे भिजले होते. याचा फटका बसून सोयाबीन उगवणीसंदर्भात तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी राखून ठेवलेलेच बियाणे उगवण क्षमता तपासून वापरावे.

-डॉ. राहूल पाटील, आमदार, परभणी

ज्या शेतकऱ्याकडे स्वताच्या गरजे पेक्षा जास्त सोयाबीन बियाणे उपलब्ध आहे. अश्या शेतकऱ्यांकडून शासकीय बिज तपासणी प्रयोगशाळेतून फक्त 40 रुपये प्रति नमुना फीस भरलेली आहे. आता पर्यंत 40 ते 50 नमुने प्रयोगशाळेत उगवण क्षमता तपासणी साठी पाठविलेले आहेत. शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकामार्फत बीज परीक्षण करून घ्यावे.

- पी. बी. बनसावडे, तालुका कृषी अधिकारी, परभणी.

संपादन- प्रल्हाद कांबळे