परभणी : गुलाबी मैना, पिवळा धोबी, नकटा बदकाचे जिल्हात आगमन

file photo
file photo

परभणी ः दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसात निरनिराळ्या देशातून व भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातून पक्षांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत असते. यंदाही अश्या आकर्षक परदेशी पक्षांचे जिल्ह्यात आगमन झाले असून आतापर्यंत 16 पक्षांची पक्षीमित्रांनी नोंद घेतली आहे. त्याचबरोबर देशांतर्गत ही 11 पक्षांचे जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पानथळ्यावर आगमन झाल्याचे दिसून आले आहे.

सध्या लडाख, तिबेट, रशिया, सायबेरिया, मलेशिया, युरोप या भागातुन अनेक विदेशी पक्षी हिवाळयात परभणी जिल्ह्यात येतात. उत्तरेकडे बर्फवृष्टी झाल्याने व तलाव बर्फाने झाकले गेल्याने हे बहुतांश पक्षी स्थलांतरीत होत असतात. या काळात त्यांना अन्न मिळणे कठीण होते म्हणून ते महाराष्ट्रीतील पानथळ्यावर मुक्कामी येत असतात. हिवाळा सुरु होताच नदया, तलाव, पाणथळी, हिवाळी स्थलांतरीत पक्ष्यांनी भरुन जातात. मराठवाडयात परभणी जिल्ह्यामध्ये स्थलांतर करुन येणाऱ्या पक्ष्यांमध्ये पाणपक्षी, वृक्षपक्षी यांचा समावेश होतो. सध्या जिंतूरमधील तलाव व पानथळ्यामध्ये या पक्षाच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत.

अशी आहेत विदेशी पक्षांची नावे

तलवार बदक (Northern Pintail), नकटा बदक (Knob billed duck),  पिवळा धोबी (yellow wagtail), भुवई बदक (Garganey), हिरवा टिलवा (Common Greenshank), सामान्य तुतारी  (Common Sandpiper),

पांढरा धोबी (White Wagtail), गुलाबी मैना ( Rosy Starling), सामान्य खरुची (Common Kestrel), मलीन बदक (Gadwall), ठिपकेवाला तुतारी (Wood Sandpiper), चक्रांग बदक (Eurasian Teal), छोटी लालसरी (Common Pochard), पिवळया डोक्याचा धोबी (Citrine Wagtail), करडा धोबी (Gray Wagtail), थापटया बदक (Northern Shoveller)

स्थानिक स्थलांतर करणारे पक्षी

चित्रबलाक (Painted Stork), हळदी कुंकु बदक (Spotted Billed Duck), शेकाटया (Black Winged Stilt), काळया डोक्याचा शराटी (Black Headed Ibis), मोर शराटी (Glossy Ibis), गायबगळा (Cattle Egret), मोठा बगळा (Great Egret), मध्यम बगळा (Intermediate Egret), अडई (Lesser Whistling Duck), वारकरी (Common Coot), सामान्य खंडया (Common Kingfisher)

विदेशी पक्षी ठरलेल्या ऋतुमध्ये नियमीतपणे स्थलांतर करीत असतात. पक्ष्यांचे स्थलांतर हे खादयाचा तुटवडा पडल्याने होते. तर काही पक्षी स्थलांतर हे प्रजननासाठी सुध्दा होत असते. काही पक्षी देशांतर्गत स्थलांतर करतात तर काही देशाबाहेरुन येत असतात.

- अनिल उरटवाड, पक्षीमित्र, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com