परभणीत भाजपा नेत्यांसह मंत्र्यांची स्वबळाची भाषा

कैलास चव्हाण
रविवार, 24 जून 2018

पुढे बोलताना श्री. दानवे म्हणाले, देशात भाजपाविरोधात कितीही वल्गणा झाल्या तरी देशात भाजपाची 22 राज्यात सत्ता आली आहे. संघटना मजबुत असल्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगत आगामी निवडणुकासाठी बुधनिहाय संघटन आणखी मजबुत करावे...

परभणी - कितीही पक्ष एकत्र येऊन भाजप विरोधात लढले तरी हरकत नाही. आपले संघटन मजबुत आहे. असे सांगत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यासह मंत्र्यांनी स्वबळावर लढण्याची भाषा करत आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याची आवाहन परभणीतील कार्यकर्ता मेळाव्यात केले.

भारतीय जनता पार्टीच्या महानगर शाखेच्या वतीने रविवारी (ता. 24) येथील श्रीकृष्ण गार्डन  मंगल कार्यालयात आयेजित परभणी विधानसभा बुध कार्यकर्ता मेळावा व राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमास महसुल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे,पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, आमदार मोहन फड, माजी आमदार विजय गव्हाणे, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. दानवे म्हणाले, देशात भाजपाविरोधात कितीही वल्गणा झाल्या तरी देशात भाजपाची 22 राज्यात सत्ता आली आहे. संघटना मजबुत असल्यामुळे हे शक्य झाल्याचे सांगत आगामी निवडणुकासाठी बुधनिहाय संघटन आणखी मजबुत करावे, परभणी लोकसभेसह जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात निवडणुक जिंकायची आहे असे सांगत त्यांनी स्वबळाचे 

संकेत गिले आहेत.महसुल मंत्री श्री. पाटील म्हणाले, बुथनिहाय संघटन मजबुत केले तर आपलाच पुन्हा विजय आहे असे सांगुन बुध मजबुत करण्याचे आवाहन केले. श्री. लोणीकर म्हणाले, परभणी जिल्हा हिंदुत्ववादी जिल्हा असल्याने आतापर्यंत येथे दगडधोड्यांना निवडुण दिले आहे. अनेक  गावात शाखा नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदीमुळे शिवसेनेला मतदान पडल्याचे सांगत वेळ आली आणि त्यांनी युती तोडली तर स्वबळावर निवडणुक जिंकु असे म्हणाले.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani BJP leader will contest the election on his own