esakal | परभणीसह परिसरात जमिनीतून गूढ आवाज
sakal

बोलून बातमी शोधा

hingoli photo

परभणीसह परिसरात जमिनीतून गूढ आवाज

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : परभणी शहर Parbhani व परिसरात रविवारी (ता.११) सकाळी जमिनीतुन गूढ आवाज व सौम्य हादरे जाणवले. परन्तु या घटनेला प्रशासनाच्या वतीने अधिकृत दुजोरा मिळाला नाही. लातूर Latur येथील भूकंप मापक केंद्राच्या Earthquake वतीने मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात दाखवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी ४.४ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याचा परिणाम आजूबाजूच्या जिल्ह्यात पाहावयास मिळाला. परभणी जिल्ह्यातील काही भागात रविवारी (ता.११) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास जमिनीतून आवाज येत सौम्य हादरा बसला. सकाळी साडेआठ वाजता परभणीत बहुतांशी नागरिक सकाळच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना या भूकंपाच्या हादऱ्याची जाणीव झाली नाही.parbhani breaking news mistrious sound on earth

हेही वाचा: Nanded : नांदेडला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

जमिनीतून आवाज येत जमीन हादरल्याचे काही नागरिकांना जाणवले. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून या घटनेला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र आहे. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यात याची जाणीव होऊ शकते. परभणीत तशी नोंद अद्याप नाही. तरी नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर District Collector Deepak Mugalikar यांनी केले आहे.

loading image