esakal | Nanded : नांदेडला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेडला भूकंपाचे धक्के

Nanded : नांदेडला भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : शहरासह Earthquake परिसरामध्ये रविवारी (ता.११) सकाळी पावणेसातच्या सुमारास जमिनीतून गुढ आवाज आल्याने नागरिकांमध्ये भूकंपाची भिती निर्माण झाली आहे. परंतु, प्रशासनामार्फत अद्यापही काहीच माहिती दिली जात नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. नांदेड Nanded शहरामध्ये छत्रपती चौक, फरांदेनगर, गोदावरी नगर, मालेगाव रोड, स्नेहनगर पोलिस काॅलनी, नालंदानगर, काबरानगर, एकतानगर फरांदेनगर, छत्रपती चौक वजीराबाद, सिडको, तरोडा, नवीन पुल, पूर्णा रोड आदी भागांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने घरातील खुर्च्या, पलंग हालल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले आहे.nanded breaking news earthquake hit city, fear among residents

हेही वाचा: हिंगोली जिल्ह्याला भूकंपाचे सौम्य धक्के,भूगर्भातून आवाज

तसेच अर्धापूरातही Ardhapur सकाळी ८.३८ वाजता पत्रे हालल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे केंद्र असून ४.४ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद तेथे आहे. स्वामी रामानंमद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील Swami Ramanand Thirth Marathwada University डाॅ. टी. विजयकुमार नांदेडमध्ये बसलेल्या सौम्य धक्क्यांविषयी माहिती घेत आहेत. दोन्ही ठिकाणी भूकंपाची एकच वेळ दाखवत असल्याने माहिती मिळण्यास अडचण येत असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील मुडाणा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. तेथून ३०० किलोमीटर अंतरावर धक्के जाणवले असून नांदेडलाही त्याचा हादरा बसला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात रिश्टर स्केल तपासण्याचे काम सुरू आहे.

loading image