esakal | राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

NCP

पीडिता सोनपेठ येथील पोलिस ठाण्यात गेल्यावर तेथे गुन्हा नोंदविला गेला नसल्याचे सांगितले. पोलिस ते गृहमंत्री यांच्याकडे गेले.

राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्यावर बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल होणार?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

परभणी -  जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश विटेकर यांनी लग्न, नोकरीचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने आज गुरुवारी (ता.एक) केला. पुणे येथे पीडितेसह भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात तिने हे आरोप केले. पुढे पीडित महिला म्हणाली, की नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केला. घडलेल्या प्रकाराची वाच्यता कुठेही न करण्याची धमकी दिली.

पीडिता सोनपेठ येथील पोलिस ठाण्यात गेल्यावर तेथे गुन्हा नोंदविला गेला नसल्याचे सांगितले. पोलिस ते गृहमंत्री यांच्याकडे गेले. पण खोटे गुन्हे माझ्यावर दाखल केले गेले, अशी व्यथा पीडितेने मांडली. पोलिस ठाण्यातून हाकलून देण्यात आले. शिक्षिका असून त्रास दिला जात असल्याचा आरोप महिलेने केले. याप्रसंगी देसाई म्हणाल्या, की राजेश विटेकरांसह साथीदारांवर गुन्हे दाखल न झाल्यास परभणीत आंदोलन केले जाईल. जिल्ह्याचे पालकमंत्री नबाब मलिक व माजी मंत्री फौजिया खान राजेश विटेकरांना पाठिशी घालत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

Edited - Ganesh Pitekar

loading image