Parbhani Breaking : सकाळी एकाच्या मृत्यूचा धक्का तर, रात्री सहा पॉझिटिव्ह 

file photo
file photo
Updated on

परभणी : परभणी जिल्ह्यात शनिवारी (ता.२९) सकाळी वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथील एका साठ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्का बसला होता. या धक्क्यातून परभणीकर सावरतो न तोच शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामध्ये परभणी शहरातील इटलापूर मोहल्ला भागातील तीन तर जिंतूर तालुक्यातील सांवगी भांबळे येथील दोन आणि गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याची एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या ८० झाली आहे.

परभणी जिल्ह्यातील जनतेसाठी ही चिंताजनक बाब आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास आलेल्या अहवालात सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. परभणी शहरातील इटलापूर मोहल्ला भागातील तीन तर जिंतूर तालुक्यातील सांवगी भांबळे येथील दोन आणि गंगाखेड तालुक्यातील नागठाणा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. वाघी बोबडे येथील व्यक्तीच्या अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला होता. एक दिवस उलटल्यावर शनिवारी सकाळी त्या व्यक्तीचा सकाळी मृत्यू झाला आहे. 

अंत्यसंस्कारासाठी तब्बल दोन तास उशिर
वाघी बोबडे (ता.जिंतूर) येथील कोरोनाबाधित एका साठ वर्षे व्यक्तीचे शनिवारी (ता.३०) निधन झाले. मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यात तब्बल दोन ते अडीत तास उशिर झाला. जिल्हा रुग्णालयाच्या अक्षम्य हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे सदरील व्यक्तीच्या अंत्यसंस्कार तब्बल दोन तास विलंब झाला, असा आरोप यावेळी करण्यात आला. निधन झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी सुद्धा नियम तयार करण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीने त्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार होणे गरजेचे आहे. महापालिकेच्या पथकासह शववाहिका सकाळी सव्वासातच्या सुमारास अमरधाम स्मशानभूमीत पोचली होती. परंतु रुग्णवाहिकेतून मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुद्धा तिथे शासकीय रुग्णालयाचे वाँर्ड बाँय अथवा अन्य कुणी नव्हते. पालिका कर्मचाऱ्यांनी संबंधीत यंत्रणेकडे संपर्क साधून दोन तास प्रतिक्षा केली. परंतू, कुणाला पाठवण्यासाठी हतबलता दाखवल्यानंतर अंतिम संस्कार करण्याचे ठरले. तो पर्यंत तो मृतदेह रुग्णवाहिकेत दोन तास पडून होता. दोन तासाच्या त्यानंतर पीपीई किट, मास्क घातलेल्या त्या व्यक्तीचा मुलगा व अन्य एक अशा दोघांनीच मृतदेह सरणावर ठेवला. तत्पूर्वी त्या दोघांनाच लाकड रचण्याचे काम देखील करावे लागले. यावेळी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, नगरसचिव विकास रत्नपारखी श्री. पिंपळे यांची यांची उपस्थिती होती.

सेवकाला निकृष्ट दर्जाचे किट
स्मशानभूमीत लाकडे रचण्यासाठी सेवक आहे. त्यास देखील एक पीपीई किट दिल्याचे समजते परंतु ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होते. त्यामुळे या सेवकांने देखील लाकडे रचण्यासाठी फक्त मार्गदर्शन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

परभणी कोरोना मीटर
एकूण रुग्ण - ८०
उपचार सुरु - ७७
घरी सोडले - एक
मृत्यू - दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com