esakal | परभणी : केंद्रीय पथकाकडून कोविड सेंटरची पाहणी; लसीकरण सेंटरलाही भेटी

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना संसर्गासह उपाययोजनांबाबतचा आढावा केंद्रीय पथकाने घेण्यास सुरवात केली असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह शहरातील कोविड व व्हॅक्सिनेशन सेंटरला पथकाने भेटी दिल्या

परभणी : केंद्रीय पथकाकडून कोविड सेंटरची पाहणी; लसीकरण सेंटरलाही भेटी
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः कोरोना काळात प्रशासनाच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजना, कोविड सेंटरमधील सुविधा आणि लसीकरण कश्या पध्दतीने केले जात आहे याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक परभणीत दाखल झाले आहे. या पथकाने शुक्रवारी (ता.नऊ) शहरातील विविध भागात असलेल्या कोविड सेंटरसह लसीकरण सेंटरची ही पाहणी केली.

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना संसर्गासह उपाययोजनांबाबतचा आढावा केंद्रीय पथकाने घेण्यास सुरवात केली असून जिल्हा शासकीय रुग्णालयासह शहरातील कोविड व व्हॅक्सिनेशन सेंटरला पथकाने भेटी दिल्या.

हेही वाचा - भाई धोंडगे यांनी घेतली कोविड लस; राज्यातील सर्वात ज्येष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून नोंद

जिल्ह्यात गुरुवारी (ता.आठ) केंद्राचे दोन सदस्यीय पथक दाखल झाले. यात पथकात पाँडेचेरी येथील असिस्टंट प्रोफेसर डॉ. दिनेश बाबू व नागपूर येथील असोसिएट प्रोफेसर डॉ. रंजन सोळंकी यांचा समावेश आहे. परभणीत दाखल होताच सदस्यांनी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशीचर्चा केली. या चर्चेतून त्यांनी प्राथमिक माहिती घेतली. तसेच पुढील नियोजन यावेळी करण्यात आले. शुक्रवारी या पथकाने जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड सेंटरसह व्हॅक्सिनेशन सेंटरला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिकेचे आयुक्त देविदास पवार, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, अतिरीक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ, प्रकाश डाके, डॉ. किशोर सुरवसे यांच्यासह आदी वैद्यकीय अधिकारी त्यांच्यासमावेत होते. थकातील सदस्यांनी शहरातील कोविड सेंटरची पाहणी केली. त्यात त्यांनी रुग्णांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधा, उपचार याबाबत माहिती घेतली. त्याचबरोबर व्हॅक्सीनेशन सेंटरला भेटी देत तेथील अधिकारी - कर्मचार्‍यांशी चर्चा केली. पाथरी रस्त्यावरील डॉ. प्रफुल्ल पाटील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे पथकाने भेट दिली. त्यावेळी तेथील लसीकरण केंद्रासही भेट दिली.

सुचना व मार्गदर्शन

केंद्रीय पथकातील सदस्यांनी शुक्रवारी शहरातील विविध कोविड सेंटरमधील रुग्णावर करण्यात येणाऱ्या उपचाराची माहिती घेतली. यावेळी त्यांनी काही सुचना करून सुधारणा करण्यास सांगितले आहे. परभणी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेवून तो अहवाल केंद्र शासनास पाठविला जाणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे