esakal | परभणीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव, मुंबईवरुन आलेल्या महिलेला लागन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मुंबई येथून आलेल्या एका ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तिच्या संपर्कातील आलेल्यांचा शोध प्रशासनाने सुरु केला आहे.

परभणीत पुन्हा कोरोनाचा शिरकाव, मुंबईवरुन आलेल्या महिलेला लागन

sakal_logo
By
कैलास चव्हाण

परभणी : परभणी शहरात रविवारी (ता. १७) कोरोनाचा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई येथून आलेल्या एका ५० वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तिच्या संपर्कातील आलेल्यांचा शोध प्रशासनाने सुरु केला आहे. दरम्याण परिसर सिल करण्यात आला आहे.

शहरातील सुपरमार्केट परिसरातील मिलींदनगरात पाच दिवसापुर्वी एक ५० वर्षीय महिला मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एका वाहनातून कुटूंबासह आली. या महिलेला दोन दिवसापुर्वी त्रास सुरु झाल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे डॉक्टरांनी स्वॅब घेऊन नांदेडच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल रविवारी (ता.१७) सकाळी पॉझिटिव्ह आला आहे. 

हेही वाचानांदेडची शतकाकडे वाटचाल : आज पुन्हा १३ पॉझिटिव्ह

संबधीत परिसरात कडक पोलीस बंदोबस्त 

त्यामुळे खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने त्या महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु केला आहे. अहवाल प्राप्त होताच संबधीत परिसरात कडक पोलीस बंदोबस्त लावला असून परिसर सिल करण्यात आला आहे. तसेच महापालीकेच्या पथकांनी परिसर ताब्यात घेत फवारणी सुरु केली आहे. यापुर्वी शेवडी (ता. जिंतुर) येथे मुंबईहुन आलेल्या तिघांना कोरोनाची लागन झाली आहे. तर परभणीत एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.

मानवतच्या दांम्पत्याचा अहवाल निगेटीव्ह

मुंबई येथील वास्तव्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या मानवत येथील त्या दांम्पत्याचा अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मानवत शहरातील एक दाम्पत्य मुंबईत नातेवाईकाकडे वास्तव्यास होते. त्यातील एका नातेवाईकास कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. तत्पुर्वीच हे दाम्पत्य तेथून ता. आठ मे रोजी खासगी वाहनाने मानवतला आले होते.

दोघांचेही स्वॅब निगेटीव्ह

त्यामुळे प्रशासनाने बुधवारी (ता. १३) या दोघांची वैद्यकीय चाचणी करत त्यांचे स्वॅब नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेकडे पाठविले होते. त्याचा अहवाल रविवारी सकाळी प्राप्त झाला. त्यात दोघांचेही स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.