Parbhani : बीड पॅटर्ननुसार आता पीकविमा योजना कार्यान्वित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani

Parbhani : बीड पॅटर्ननुसार आता पीकविमा योजना कार्यान्वित

परभणी : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम- २०२२ शासनाने राबविण्यासाठी शासन निर्णय ता. १ जुलै २०२२ अन्वये जिल्ह्यामध्ये आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीकडून राबविण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार राज्य शासनाने कप अ‍ॅन्ड कॅप मॉडेलनुसार (८०-११०) बीड पॅटर्ननुसार राबविण्यास मान्यता दिली आहे.

या योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२२-२३ या वर्षाकरिता जोखीमस्तर सर्व अधिसूचित पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे. कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी व्हायचे किंवा नाही, याबाबत निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणे बाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी

होण्याच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस अगोदर देणे अपेक्षीत आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठीची कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ता. ३१ जुलै ही समान अंतिम मुदत आहे. पीक विमा भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड/आधार नोंदणीची प्रत, सातबारा उतारा, अधिसूचित पिकांचे पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, संमतीपत्र, बँक पासबुकची प्रत जोडावी लागणार आहे.

अर्जदाव्यासाठी सीएससी केंद्रांची सोय

शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी, यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकरी आपले अर्ज, विमा हप्ता सामाईक सुविधा केंद्र (CSC) मार्फत ऑनलाइन पद्धतीने निःशुल्क भरू शकतात. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्जदावा करण्याची सुविधा राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सामाईक सुविधा केंद्र (CSC) येथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

जिल्ह्यासाठी पुढील पिकांचा विमा शेतकऱ्यांना घेता येणार असून, त्यासाठी लागणार विमा हप्ता दर पुढीलप्रमाणे असणार आहे. यामध्ये खरीप ज्वारी ५९५ रुपये, बाजरी ५०० रुपये, सोयाबीन ११०० रुपये, मुग ४४० रुपये, उडीद ४४० रुपये, तूर ७३६ रुपये, कापूस २७५० रुपये याप्रमाणे राहील.

- विजयकुमार लोखंडे, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी, परभणी

Web Title: Parbhani Crop Insurance Scheme Now Bead Pattern

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top