

Darpan Award for Padma Shri Dr. Smita Kolhe
esakal
परभणी: मेळघाट परिसरातील आदिवासींच्या शिक्षण, आरोग्य तसेच ग्रामविकासाच्या संदर्भात ज्यांनी संपूर्ण जीवनभर समर्पित कार्य करून परिवर्तन घडविले अशा पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना यावर्षीचा (कै.) सौ. कमलताई जामकर दर्पण पुरस्कार सोमवारी (ता. नऊ) मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. सदरील पुरस्कार महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आमदार रूपाली चाकणकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.