esakal | Parbhani : सोमवारपासून घंटा वाजणार
sakal

बोलून बातमी शोधा

parbhani

Parbhani : सोमवारपासून घंटा वाजणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सोमवारी, ता. चार ऑक्टोबर रोजीपासून सर्व शासन परिपत्रक व दिलेल्या सुचनांच्या अधिन राहून सुरू करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दिली आहे.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने जिल्ह्यातील शाळा दीड ते दोन वर्षापासून बंद आहेत. सध्या ऑनलाईन क्लासेस सुरु असले तरी त्याद्वारे म्हणावे त्या पध्दतीने अध्यापन होत नसल्याचे समोर आले आहे. मध्यंतरीच्या काळात कोरोना संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला होता. परंतू पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शाळा बंद करण्याचे आदेश राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने दिले होते. त्यामुळे विद्यार्थांच्या आनंदावर विरजन पडले होते. त्यानंतर परत तीन ते चार महिण्यापासून शाळांचे दरवाजे बंद होते.

परंतू आता जिल्ह्यात कोरोनाची परिस्थित सुधारली आहे. सक्रीय रुग्णांची संख्या ही २० च्याखाली आली आहे. आरटीपीसीआर चाचण्यामध्ये देखील रुग्ण सापडत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर भागात ता.१५ जुन पासून शैक्षणिक वर्ष सुरु करण्याबाबत जाहीर केले आहे. ता. सात जुलै च्या परिपत्रकान्वये जिल्ह्यातील कोव्हिडमुक्त क्षेत्रात ग्रामीण भागातील शासन निर्णयातील निकषाच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले आहेत. ता. २४ सप्टेंबर रोजीच्या शासन परिपत्रकानूसार सोमवारी, ता. चार ऑक्टोबरपासून ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग व शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त आहेत. असेही शिक्षणाधिकारी, परभणी यांनी कळविले आहे.

loading image
go to top