
Gram Panchayat Websites
sakal
परभणी : जिल्ह्याने ग्रामपंचायतींच्या डिजिटल युगात दमदार प्रवेश करत, संपूर्ण राज्यासाठी एक नवा आदर्श घालून दिला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतींच्या वेबसाइट्स केवळ एका दिवशी, तीन तासांत तयार केल्या. हा एक विक्रमी आणि ऐतिहासिक क्षण ठरला. परभणीने ग्रामीण प्रशासनाला डिजिटल सक्षमीकरणाच्या दिशेने मोठी झेप दिली.