परभणी जिल्ह्यात दोन हजार 249 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण ; महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण

file photo
file photo

परभणी : जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रसार सध्या कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. एकीकडे प्रशासनाकडून राबविल्या जाणाऱ्या उपाय योजना व दुसरीकडे लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचा उत्साह पाहता जिल्हा लवकरच कोरोना मुक्तीकडे  वाटचाल करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्या दोन हजार 249 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोना संक्रमित रुग्णांचा आकडा सात हजार 940 ऐवढा झाला आहे. परंतू कोरोनावर मात करून परत आपल्या घरी आलेल्या रुग्णांची संख्या ही 7 हजार 572 ऐवढी आहे. परंतू कोरोना विषाणुशी झुंज देत जिल्ह्यात गुरुवार (ता.28) पर्यंत 313 जणांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गामुळे मृत्युचे प्रमाण अधिक असले तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाणही तितकेच जास्त आहे. गुरुवारी रात्री पर्यंत जिल्ह्यात 55 कोरोना बाधित उपचार घेत होते. त्यापैकी 33 रुग्णांना कसलेही लक्षणे नसल्याने त्यांच्यावर घरी राहूनच उपचार केले जात आहेत.

10 हजार 800 जणांची ऑनलाईन नोंदणी

एकीकडे रुग्ण संख्या कमी होत असतांना दुसरीकडे कोव्हिड - 19 लसीकरणाचे काम ही जिल्ह्यात जोरात सुरु आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका व आरोग्य क्षेत्राशी निगडित सर्वांचे लसीकरण केले जात आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने

ऑनलाईन नोंदणी करून घेतली होती. त्यात 10 हजार 800 जणांनी आपले नाव नोंदविले होते. त्यांना दोन दिवस आगावू सुचना देवून लसीकरण केंद्रावर बोलविले जात आहे.

जिल्ह्यात 2 हजार 249 जणांचे लसीकरण पूर्ण

जिल्ह्यात गुरुवार (ता.28) पर्यंत 2 हजार 249 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात लसीकरणाच्या केंद्राची संख्या वाढविण्यात आली आहे. आता जिल्ह्यातील 8 ठिकाणी हे लसीकरण केले जात आहे. त्यात सेलू उपजिल्हा रुग्णालयात 585, महापालिका रुग्णालयात 445, जांब प्राथमिक आरोग्य केंद्रात 397, शासकीय रुग्णालयात 228, पिंगळी प्राथमिक आरोग्य केंद्रात 87, पूर्णा ग्रामीण रुग्णालयात 337, गंगाखेड उप जिल्हा रुग्णालयात 123 तर जिंतूर ग्रामीण रुग्णालयात 47 जणांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

लसीकरणाच महिलांचा टक्का अधिक

कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्यात महिलांचा टक्का सर्वाधिक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. आता पर्यंत 2 हजार 249 पैकी तब्बल 1601 महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील लसीकरण पूर्ण करून घेतले आहे. तर पुरुष अधिकारी,  कर्मचाऱ्य़ांची संख्या केवळ 648 ऐवढीच आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com