सरत्या वर्षात परभणी पोलिसांची चमकदार कामगिरी ; अनेक गुन्हे 100 टक्के उघडकीस, प्रतिबंधात्मक कारवाई देखील यशस्वी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

In Parbhani district, the police have solved many crimes in a year and arrested the accused

वर्षभरात पोलिसांनी चमकदार कामगिरी बजावत अनेक गुन्ह्याची 100 टक्के उकल करून आरोपींना जेरबंद केले आहे.

सरत्या वर्षात परभणी पोलिसांची चमकदार कामगिरी ; अनेक गुन्हे 100 टक्के उघडकीस, प्रतिबंधात्मक कारवाई देखील यशस्वी

परभणी : 2020 हे वर्ष सर्वांसाठी संकटाचे वर्ष म्हणून ओळखले जाई. परंतु या संकट काळातही परभणी जिल्हा पोलिसांची कामगिरी देखील लक्षात राहण्या जोगी ठरली आहे. वर्षभरात पोलिसांनी चमकदार कामगिरी बजावत अनेक गुन्ह्याची 100 टक्के उकल करून आरोपींना जेरबंद केले आहे. केवळ गुन्हे उघडकीस आणणे हेच काम पोलिसांनी केले नाही तर कोरोना काळात साथरोग नियंत्रणांसंदर्भातही पोलिसांनी जिल्हाभरात नाकाबंदी राबवून प्रभावीपणे अंमलबजावणी करून जनजागृतीचे काम देखील केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

परभणी जिल्हा पोलिस दलाची कामगिरी दरवर्षीच चमकदार असते. गुन्ह्याच्या बाबतीत कुठलाही पोलिस अधिकारी हलगर्जीपणा करत नसल्याने गुन्ह्याची उकल होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयाच्यावतीने नुकतीच वर्षभरातील गुन्हे व त्यांची उकल याची आकडेवारी प्रसिध्द करण्यात आली. त्यात महत्वपूर्ण 10 गुन्ह्याची आकडेवारी पाहता पोलिस दलाची कॉलर अजूनच कडक झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात 2020 या वर्षात 34 खुनाच्या घटना घडल्या. त्यापैकी 33 गुन्हे उघडकीस आले आहेत. खुनाचा प्रयत्न करणाऱ्या 118 घटना घडल्या असून 117 मध्ये आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यांना गजाआड करण्यात ही पोलिसांना यश आले आहे.

बलात्काराच्या 63 घटना घडल्या असून त्यापैकी सर्व 63 गुन्ह्यातील आरोपींना अटक करून पिडितांना न्याय मिळून दिला आहे. दरोड्याच्या 4 पैकी 2 घटना उघडकीस आल्या आहेत. इतर दोन घटनामधील आरोपी लवकर ताब्यात येण्याची शक्यता आहे. जबरी चोरीचे 38 गुन्हे घडले असून 17 गुन्ह्याची उकल झाली आहे. चोरीच्या 602 घटना घडल्या असून 220 प्रकरणे उघडकीस आली आहेत. 101 दंगा पसरविण्याचे गुन्हे दाखल झाले. त्यापैकी सर्वच गुन्ह्याची उकल झाली आहे. दुखापत करण्याच्या 1045 घटना घडल्या असून 1043 गुन्ह्यातील आरोपींना निष्पन्न केले आहे. जुगाराचे 307 गुन्हे दाखल असून सर्वच सर्व 307 गुन्ह्याची उकल झाली आहे. दारूबंदीचे 1011 गुन्हे घडले असून 1011 गुन्हे उघडकीस आली आहेत.

मराठवाड्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

कोरोनाच्या संकटातही चांगले काम

कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात करण्यात आलेल्या जिल्हाबंदीची पोलिसांकडून चांगली अंमलबजावणी करण्यात आली. तत्कालीन पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी विशेष लक्ष देवून या काळात साथरोग प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने यशस्वी प्रयत्न केले. साथरोगासंदर्भात केवळ कारवाईच केली नाही तर लोकांमध्ये त्याची जनजागृतीचे काम देखील पोलिसांनी अथकपणे पूर्ण केले.

loading image
go to top