esakal | पंचनामे डोळसपणे करण्याच्या सीईओंच्या सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

parbhani

Parbhani : पंचनामे डोळसपणे करण्याच्या सीईओंच्या सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या अतोनात नुकसानीचे पंचनामे जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आणि पीक विमा कंपन्यांनी प्रामाणिक आणि डोळसपणे करण्याच्या सूचनाजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी मंगळवारी (ता. पाच) दिल्या आहेत.

शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने व्हावेत म्हणून ता. ५ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हा परिषदेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी सभापती दादासाहेब टेंगसे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुभाष कदम, डीआरडीए च्या पी डी रश्मी खांडेकर, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, श्री लोखंडे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. सूचना देताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. टाकसाळे म्हणाले, परभणी जिल्ह्यात सरासरी साडेसातशे मिलिमीटर पावसाचे प्रमाण आहे परंतु यावर्षी जिल्ह्यातील सर्वच भागांमध्ये अकराशे मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला.

अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, उडीद, मूग अशा पिकांचे भरमसाठ नुकसान झाले आहे. आजच्या परिस्थिती शेतात जाता येत नाहीये नद्या-नाल्या प्रचंड भरलेल्या आहेत नद्या आणि ओढ्यांच्या काठच्या जमीनी तर वाहून गेल्या आहेत. पिकं जेव्हा फुलवऱ्यामध्ये होती तेव्हा पाऊस होता, काढणीला आली तेव्हाही पाऊस आला आणि आता काहीसे धान्य काढले तर तेही काळे झाले. उरलेले धान्य उन्हामुळे शेंगा तडकून जाणार अशी दयनीय अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळजीपूर्वक व तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करण्या बाबत शिवानंद टाकसाळे यांनी सूचित केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ सुभाष कदम यांनी उपस्थितांना पीक कापणी प्रयोग, मंडळातील प्रति हेक्टरी रेषो, पीक विमा मधील तांत्रिक बाबी लक्षात आणून दिल्या.

loading image
go to top