
सदरील घटनेचे सविस्तर वृत असे की, मुंबई येथील डाॅक्टर महिला उज्वला संदिप बोराडे (रा. मालाड, मुंबई ) येथील रहिवाशी यांच्या दवाखान्यात उपचारासाठी सुनिता नावाची महिला तिच्या पती व मुलीसह येत असे डाॅ. उज्वला बोराडे व सदरिल महिला यांच्यात ओळख झाली.
सेलू ( जिल्हा परभणी) : मुंबई येथील महिला डाॅक्टरला कमी भावात सोने देण्याच्या बहाण्याने सेलू येथे बोलवून तब्बल आठ लाख २१ हजार रूपयास लुटल्याची घटना शुक्रवारी ( ता. २५ ) रोजी सायंकाळी ५. ४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
सदरील घटनेचे सविस्तर वृत असे की, मुंबई येथील डाॅक्टर महिला उज्वला संदिप बोराडे (रा. मालाड, मुंबई ) येथील रहिवाशी यांच्या दवाखान्यात उपचारासाठी सुनिता नावाची महिला तिच्या पती व मुलीसह येत असे. डाॅ. उज्वला बोराडे व सदरील महिला यांच्यात ओळख झाली. एके दिवशी सुनिता नावाच्या महिलेने डाॅ. उज्वला बोराडे यांना फोनवरुन शेतात एक किलो सोने सापडले असल्याचे सांगुन तुम्ही खरेदी करणार असाल तर तुम्हाला कमी दरात म्हणजे तीस हजार रुपये तोळा सोने देवु असे सांगितले. त्यानंतर सुनिताच्या सतत येणार्या फोनमुळे डाॅ. उज्वला बोराडे यांनी सुनिताला सेलू येथे (ता.०८) डिसेंबर रोजी भेट देवुन तिच्याकडुन दहा ग्राम सोने यामध्ये एक गिन्नी व एक अंगठी खरेदी केली. हे सोने खरे आहे का? नाही याची शहनिशा मुंबईतील त्यांच्या पाहुण्याकडे करुन घेतली. ते सोने खरे असल्याची खात्री पटली.
हेही वाचा - हिंगोली : जिल्ह्यातील ४६ शाळा सुरु करण्यास शिक्षण विभागाची मान्यता
परत डाॅ. उज्वला बोराडे यांना सुनिता नावाच्या महिलेचा फोन येत होता की, आपण उर्वरित सोने घेवुन जावे. त्यानंतर डाॅ. उज्वला बोराडे या त्यांच्या पतीसह व इतर दोघांना घेवुन सेलू येथे (ता.२५ ) डिसेंबर रोजी आल्या. त्यानंतर सदरिल महिला सुनिता हिचा मामा याने या सर्व मंडळींना सेलूतील रायगड काँर्नर येथे चहा पाणी करुन सध्या शेतात लोक असल्याने उशीरा पाच ते सहा नंतर आपला व्यवहार करु असे सांगितले. त्यानंतर सायंकाळी सहानंतर सेलू ते देवगाव ( फाटा ) रस्त्यावरील खानीचा मारोती मंदीराच्या पाठीमागे डिग्रस (बरसाले ) शिवारातील शेतात बोलावुन डाॅ. उज्वला बोराडे व त्या सोबत असेलल्या तीन जणांना सुनिता नावाच्या महिलेसह दबाधरुन असेलेल्या इतर सात जणांनी काठ्यांनी मारहाण करत त्यांच्याजवळील पर्स त्यामध्ये असलले एक लाख रुपये, दोन मोबाईल फोन, इलेक्ट्रिक वजन काटा व त्यांच्या मामाकडील काळ्या रंगाची बँगेतील सात लाख असा एकुण आठ लाख २१ हजारांचा ऐवज लुटुन नेल्याची घटना घडली. सदरील घटनेचा गुन्हा सेलू पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला. असुन घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय रामोड, पोलिस उपनिरिक्षक जसप्रीत कोटतीर्थवीले यांच्यासह पोलीस कर्मचारी करत आहेत.
संपादन - प्रल्हाद कांबळे