हिंगोली : जिल्ह्यातील ४६ शाळा सुरु करण्यास शिक्षण विभागाची मान्यता

file photo
file photo

हिंगोली : कोरोनाच्या संकटामुळे मध्यंतरीच्या काळात शाळा सुरू झाल्या नव्हत्या, कोरोनाचा जो कमी होत असल्याने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शासनाने मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यातील शाळा टप्याटप्याने सुरू होत आहेत. जिल्ह्यातील ४६ शाळा सुरू करण्याबाबत प्राथमिक शिक्षण अधिकारी पी. बी. पावसे यांनी मान्यता दिली आहे.

हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी ४१ शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी रूपेश जयवंशी यांनी परवानगी दिल्यानंतर शिक्षण विभागातर्फे संबंधित शाळेचे हमीपत्र प्राप्त झाल्यानंतर शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे यांनी या शाळा सुरू करण्याला मान्यता दिली होती. त्यानंतर टप्याटप्याने अनेक शाळेचे प्रस्ताव शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याने त्याबाबतची माहिती जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांना दिल्याने त्यांनी दिलेल्या आदेशावरून आता जिल्ह्यातील ४६ शाळा सुरू करण्याबाबत पी. बी. पावसे यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.

ज्यामध्ये वसमत तालुक्यातील निवासी हायस्कुल बाराशीव, पुंजाजी पाटील माध्यमिक विद्यालय सुकळी, दणकेश्वर विद्यालय आडगाव रंजेबुवा, विश्वभारती निवासी कनिष्ठ महाविद्यालय हयातनगर, शिवाजी विद्यालय सावंगी, सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय हट्टा, छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय पार्डी बुद्रुक, श्री रोकडेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पांगरा शिंदे, माणकेश्वर विद्यालय कौठा , औंढा नागनाव तालुक्यातील महावीर मराठी हायस्कुल पिंपळदरी, मधोमती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय लाख, विद्यालय माळहिवरा, जिजामाता माध्यमिक विद्यालय वडद एकांबा, चंदूलाल गोवर्धनदास मुंदडा हायस्कुल सिरसम, गुरूदास कामत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय इंचा, धनसिंग नाईक माध्यमिक विद्यालय पेडगाव कळमनुरी तालुक्यातील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय दांडेगाव, नारायणराव वाघमारे कनिष्ठ महाविद्यालय आखाडा बाळापूर, सोनिया गांधी उर्दू हायस्कुल आखाडा बाळापूर, गोकुळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येहळेगाव गवळी, लिमरा कनिष्ठ महाविद्यालय वारंगाफाटा, स्व गंगाबाई शिंदे माध्यमिक विद्यालय जाब सिंदगी, .डॉ.शंकरराव सातव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जवळा पांचाळ, संत तुकाराम महाराज माध्यमिक विद्यालय सुकळी वीर,.बापुराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय  डोंगरकडा, साई पब्लिक विद्यालय सेमी इंग्रजी वारंगाफाटा, शिवपुरी महाराज माध्यमिक विद्यालय नांदापूर, मदर तेरेसा इंग्लिश हायस्कुल आखाडा बाळापूर, प्रहरी सैनिकी इंग्लिश हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज पेठवडगाव, मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यालय कवडा, डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण विद्यालय माटेगाव, जटाशंकर माध्यमिक विद्यालय वडगाव, सेनगाव तालुक्यातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आडोळ, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ताकतोडा, श्री संगमेश्वर ज्ञानमंदीर जयपुर, लोकमाता अहिल्यादेवी नागनाव होळकर कनिष्ठ महाविद्यालय पुसेगाव, डॉ.सलीम झकेरीया उर्दू हायस्कुल पुसेगाव, जयभारत माध्यमिक व , उच्च माध्यमिक विद्यालय जवळा बुद्रुक डॉ.नामदेव विद्यालय वाघजाळी, माणिक पोद्दार स्कुल वाढोणा या शाळांचा समावेश आहे. शासनाने कोरोना संदर्भात दिलेले नियम पाळत या शाळा सुरु होणार आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com