
ती सर्व यंत्रणा कामाला लावून तातडीने काढून घेतल्याने दोन्ही कालव्यामधून शेवटपर्यंत पाणी पोचले असल्याची माहिती धरण सुत्रांनी दिली.त्यामूळे शेतकर्यांत समाधानाचे वातावरण पसरले.
सेलू (जिल्हा परभणी) : लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून ( ता.०२ ) डिसेंबर रोजी सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले.पाणी सोडण्यापूर्वी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी धरणाच्या दोन्ही कालव्याला भेटी देऊन जिथे गाळ अथवा झुडुपे वाढलेली होती. ती सर्व यंत्रणा कामाला लावून तातडीने काढून घेतल्याने दोन्ही कालव्यामधून शेवटपर्यंत पाणी पोचले असल्याची माहिती धरण सुत्रांनी दिली.त्यामूळे शेतकर्यांत समाधानाचे वातावरण पसरले.
लोअर दुधना प्रकल्पातून सेलू,जिंतूर,मानवत व परभणी या तालुक्यातील आठ्ठावीस हजार ६९८ हेक्टर क्षेत्रास धरणाच्या दोन्ही कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा लाभ मिळाला असून या प्रकल्पास शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश होऊन राज्य शासनाच्या संयुक्त अर्थ साहाय्याने प्रकल्प पूर्ण झाला. यावर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरण शंभर टक्के भरले.या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे कालव्यात काही ठिकाणी गाळ साचून झाडेझुडुपे वाढलेली होती. कार्यकारी अभियंता प्रसाद लांब यांनी तातडीने संबंधित कंत्राटदारांना सांगून आणि स्वतः थांबून सर्व ठिकाणच्या अडचणी स्वतः दूर करून घेतल्या.( ता.०२ ) डिसेंबर रोजी डाव्या व उजव्या कालव्यातून २१ क्यूसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.कालव्यातून काही अडचण निर्माण होऊ नये म्हणून श्री.लांब हे दिवसा व रात्री देखील दोन्ही कालव्याच्या क्षेत्रात स्वतः फिरून पाहणी करित होते.त्यामूळे कालव्याची स्वच्छता झाल्याने पाण्याचा प्रवाह चांगला राहून कालव्याच्या टेल पर्यंत पाणी पोहचले.सप्टेंबर,आॅक्टोंबरच्या सततच्या पावसामुळे खरिपातील मुग, सोयाबीन, कापुस या पिकांचे आतोनात नुकसान झाले.
हेही वाचा - परभणीत : सट्टेबाजार अटकेत, तीन लाखाचा मुद्देमाल जप्त- विशेष पथकाची कारवाई
त्यामुळे शेतकर्यांच्या आशा रब्बी हंगामातील ज्वारी, गव्हू , हरबरा आदी पिकांवर आहेत.लोअर दुधना प्रकल्पात तब्बल दहावर्षानंतर शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना धरणाच्या दोन्ही कालव्याव्दारे (ता.०२) डिसेंबर रोजी पहिली पाण्याची पाळी सोडण्यात आली.तसेच दूसरी जानेवारी तर तिसरी फेब्रुवारी महिण्यात पाणी पाळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रकल्पाचा उजवा कालवा ४८ कि.मी. तर डावा कालव्या ६९ कि. मी. आहे.यावर्षी धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने रब्बी पिकांना धरणातून पाणी मिळणार असल्याने लाभ क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करित आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे