
परभणी जिल्ह्यात तीन लाख घरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून खारीचा वाटा जमा करण्यात येणार येणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण समितीचे अध्यक्ष अच्युत महाराज दस्तापूरकर व विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे यांनी रविवारी (ता.तीन) पत्रकार परिषदेद्वारे दिली.
परभणी ः अयोध्येतील मंदिर निर्माण कार्याला सुरूवात झाली आहे. या भव्य मंदिराच्या निर्माणाच्या कार्यात अधिकाधिक रामभक्तांचे योगदान झाले पाहिजे यासाठी येत्या मकरसंक्रांतीपासून एक महिन्यात विशेष अभियान आयोजित करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यात तीन लाख घरांशी संपर्क साधून त्यांच्याकडून खारीचा वाटा जमा करण्यात येणार येणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण निधी समर्पण समितीचे अध्यक्ष अच्युत महाराज दस्तापूरकर व विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे यांनी रविवारी (ता. तीन) पत्रकार परिषदेद्वारे दिली.
अयोध्येत भव्य मंदिराची उभारणी करताना त्यात देशातील गावोगावच्या अधिकाधिक नागरिकांचे योगदान व्हावे आणि त्यांच्या भावना जोडल्या जाव्यात या हेतूने येत्या मकरसंक्रांतीपासून महिनाभरात घरोघरी जावून रामभक्त कार्यकर्ते निधी जमा करणार आहेत. जमेल तेवढा निधीप्रत्येक कुटुंबाला समर्पित करता यावा यासाठी दहा, शंभर व हजार रूपयांची कूपन्स काढण्यात आली आहेत. त्यावर असलेले नियोजित श्रीराममंदिराचे आकर्षक चित्रही त्या कूपनमुळे घरोघरी जाणार आहे. या अभियानासाठी आजवर जिल्ह्यात प्रत्येकी एक कार्यकर्ता किमान 20 घरे असे 15 हजार कार्यकर्ते तीन लाख घरांशी संपर्क साधणार आहेत. जिल्ह्यातील 871 गावे, या व्यतिरीक्त वाडी-तांडे, वस्त्या असे जिल्ह्यातील एक न एक गावाशी संपर्क साधल्या जाणार आहे. त्या अनुषंगाने भेटीगाठी, रचनेच्या दृष्टीने जिल्हा व तालुका पातळीवर कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. हे अभियान देवगिरी प्रान्ताअंतर्गत आपल्या जिल्ह्यात 15 जानेवारी पासून 15 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. अशी माहिती श्री. पांडे यांनी दिली. यामध्ये केवळ निधीच नाही तर रामभक्तांनी त्यांचा वेळही द्यावा, असे आवाहन संयोजन समितीने केले आहे.अभियानासाठी जिल्हा पातळीवर श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती स्थापन करण्यात आली आहे, असेही पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस महंत अखिले्श्वर दास,अँड.दादासाहेब पवार, माधवराव आजेगावकर, डाँ.रामेश्वर नाईक, विहिंपचे जिल्हा महामंत्री सुनिल रामपूरकर, अँड राजकुमार भांबरे,अभियान प्रमुख गणेश काळबांडे, सहअभियानप्रमुख सुरेश ठोंबरे, सहअभियानप्रमुख संतोष देवडे हे उपस्थित होते.
हेही वाचा - श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण संपर्क कार्यालयाचे शुभारंभ- संत बाबा बलविंदरसिंघ -
अशी आहे निर्माण काऱ्याची रचना
श्रीराममंदिर निर्माणासाठी मुंबई, दिल्ली, चेन्नई, गुवाहाटी येथील आयआयटी तसेच सीबीआरआय रूरकी व एल अॅण्ड टी व टाटा ईजिनिअरिंग सर्व्हिसेस येथील तंत्रज्ञ मंदिराच्या मजबूत पायासाठी विचार करत असून लवकरच त्याचे स्वरूप अंतीम होईल. मंदिराची लांबी 360 फूट व रुंदी 235 फूट असणार असून प्रत्येक मजला 20 फूट उंचीच असणार आहे. देशातील नव्या पिढीला मंदिराचा इतिहास ज्ञात व्हावा यासाठी या अभियानात घरोघरी जावून हा इतिहास सांगितला जाईल.
- अच्युत महाराज दस्तापुरकर, परभणी
संपादन- प्रल्हाद कांबळे
संपादन- प्रल्हाद कांबळे