esakal | परभणी : दुधना धरणाचे चार दरवाजे अर्ध्यामिटरने उघडले 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

धरण नव्वद टक्याच्यावर भरल्याने दुधना धरण पूर नियंत्रण कक्षाचा निर्णय. 

परभणी : दुधना धरणाचे चार दरवाजे अर्ध्यामिटरने उघडले 

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट परिसरात शनिवारी ( ता. १९ ) रोजी अतिवृष्टी होऊन जलाशयाच्या साठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाल्याने लोअर दुधना धरणाचे रविवार (ता. २०) रोजी सकाळी सहा वाजता गेट क्रमांक १, २, १९, २० हे चार दरवाजे  (०.०५ ) मिटरने उघडून ने दूधना नदीपात्रात पाणी सोडले जात आहे.     

तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प पाणलोट परिसरात अचानकपणे शनिवारी ( ता. १९) रोजी जोरदार अतिवृष्टी होऊन धरणाच्या जलाशयाच्या साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत झाली . त्यामुळे रविवारी ( ता. २०) रोजी सकाळी सहा वाजता दूधना  नदीपात्रामध्ये अर्ध्या मिटरने चार दरवाजे उघडून पाण्याचा  विसर्ग सोडण्यात आला आहे. प्रशाशनाच्या वतीने दूधना नदिपात्रा लगतच्या शेतकऱ्यांनी, गावातील नागरिकांनी  नदीपात्रामध्ये कोणीही जाऊ नये आपले पशुधन व इतर साहित्य तत्काळ नदि पात्राशेजारून  काढून घेण्यात यावेत.

जालना जिह्यात तसेच धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे लोअर दुधना प्रकल्प धरण ९४.५८ टक्याच्यापूढे भरले जात असल्या कारणाने पुढील धोका ओळखून लोअर दूधना प्रकल्प धरण पूर नियंत्रण कक्षाकडून धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आले.रविवारी ( ता. २०) रोजी सकाळी सहा वाजता लोअर दुधना प्रकल्प धरणाचे एकूण चार  उघडण्यात  आले आहे. सद्य:स्थितीत त्याद्वारे एकुण विसर्ग सात हजार १९० क्युसेसने विसर्ग दुधना नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

हेही वाचा महिलांसाठी आनंदाची बातमी : प्रसूतीवेदना कमी करण्यासह सुरक्षित प्रसूतीसाठी सहायक उपकरणाची निर्मिती; अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे संशोधन

नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे

पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे/कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल अशी माहिती धरणाच्या सुत्रांनी दिली. तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे आपली व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी असे आवाहन लोअर दुधना प्रकल्प धरण पूर नियंत्रण कक्ष तसेच उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे