esakal | परभणी : गावकऱ्यांच्या वतीने मोरेगाव येथे २० खाटांचे मोफत कोरोना सेंटर
sakal

बोलून बातमी शोधा

मोरेगाव सेलू कोवीड सेंटर

परभणी : गावकऱ्यांच्या वतीने मोरेगाव येथे २० खाटांचे मोफत कोरोना सेंटर

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणार्‍या श्री. मोरेश्वरी युवा मंच (Shri Moreshwar yuva manch selu) आणि गावकऱ्यांच्या वतिने मोरेगाव ( ता. सेलू ) येथे सुरु केले २० खाटांचे मोफत कोरोना सेंटर. या कोरोना सेंटरचा (Covid center) अनेक गरीब व गरजु रुग्णांना लाभ घेता येत आहे. (Parbhani: Free Corona Center with 20 beds at Moregaon on behalf of the villagers)

मोरेगाव ता. सेलू येथिल रहिवाशी योगेश काकडे याने इ. स. २०१५ मध्ये तरुणांना एकत्र करुन गावच्या कुलदैवतेच्या नावाने सामाजिक कार्य करण्यासाठी श्री मोरेश्वरी युवा मंच आणि गावकऱ्यांच्या वतीने मोरेगाव येथे सुरु केले. २० खाटांचे मोफत कोरोना सेंटर सुरु केले. यापुर्वीही या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याचशा गरजु कुटूंबातील मुलींच्या लग्नाचा खर्च स्वत: उचलला बऱ्याचशा लग्नाला अन्नदान केले. वाढदिवसाला केक कापण्याची प्रथा बंद करून झाडे लावण्याचा उपक्रम सुरु केला. शिवजंयती निमित्त रक्तदान शिबीर घेण्याचे ठरवले व मागिल दोन तिन वर्षांपासून गावातील तरुण रक्तदान करतात. समस्या कुठलीही असो जसे की पाणी, विज, दवाखाना किंवा अन्य योगेश काकडे हजर. मागिल वर्षी कोरोनाच्या लाटेत गरजुना अन्नदान केले पायी प्रवास करणाऱ्यांना अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था केली.

हेही वाचा - आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या भाटेगाव येथे गुरुवारी (ता. २०) रात्री हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर बाळापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, उपनिरीक्षक हनमंत नकाते हे आपल्या काही सहकाऱ्यांसह भाटेगाव येथे गेले होते

गावातच नाहीतर तालुक्यात श्री. मोरेश्वरी युवा मंचचे नाव झळकु लागले. तसेच यावर्षी सुध्दा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून योगेश काकडेनी ठरवले की, आपल्याला गावातच छोटे खानी एक २० खाटांचे कोरोना सेंटर उभारायचे त्यासाठी खर्च ही भरपूर लागणार होता. सर्व गावकरी व श्री. मोरेश्वरी युवा मंचने थोडे थोडे पैसे जमा करुन गावात कोरोना सेंटर उभारले अशा प्रकारचे खेडेगावात तालुक्यातील पहिले कोरोना सेंटर झाले.या कोरोना सेंटरमध्ये फक्त पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवले जाते जेणेकरुन त्यांची गैरसोय होऊ नये. त्यांची प्रकृतीची तपासणीसाठी डॉ. राहुल मोटेगांवकर व डॉ. परमेश्वर लांडे दोन वेळेस येऊन जातात.

तसेच हे कोरोना सेंटर गावापासून दूर असलेल्या पांडुरंग विद्यालय येथे निसर्गरम्य वातावरणात सुरु करण्यात आले आहे. येथे रुग्णांना मोफत औषधोपचार, पोषक आहार नाष्टा, काढा, चहा, अंडे, कोमट पाणी दिले जाते. तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी साऊंड सिस्टीम बसवले आहेत. या कोवीड सेंटरचे उद्दघाटन सुंदर आप्पा चट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. मोरेश्वरी युवा मंच अध्यक्ष योगेश काकडे, बालाजी परभणे, सखाभाऊ नाटकर, श्रीकांत राऊत, अशोक जाधव, विशाल सोनवणे, सारंग चट्टे, दिनकर चट्टे, सचिन आकात, राजेभाऊ मगर व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी श्री. मोरेश्वरी युवा मंचच्या वतीने मोरेगाव परिसरातील लोकांना आवाहन करण्यात आले की, ज्यांची गैरसोय होत असेल अशा कोरोना पाॅझिटिव्ह व्यक्तींना येथे ॲडमिट करावे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top