esakal | परभणी ः श्रीराम जन्मभूमीसाठी अडीच कोटीचा निधी संकलित

बोलून बातमी शोधा

file photo}

या जिल्ह्यात ता. 14 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान हे निथी संकलन अभियान स्थापित समितीच्या पदाधिकार्‍यांसह हजारो रामभक्तांव्दारे राबविल्या गेले होते.

परभणी ः श्रीराम जन्मभूमीसाठी अडीच कोटीचा निधी संकलित
sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : श्रीराम जन्मभूमीत तीर्थक्षेत्र विकास निधी समर्पण महाअभियानात या जिल्ह्यात हजारो रामभक्तांनी शहरासह तालुकास्थाने, गावे, वाडी, तांडे, वस्तीपर्यंतच्या दोन लाख 88 हजदार 626 कुटूंबांबरोबर संपर्क साधून मंदिर निर्माण कार्याकरिता दोन कोटी 56 लाख 78 हजार 22 रुपये एवढा निधी संकलीत केला.

या जिल्ह्यात ता. 14 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान हे निथी संकलन अभियान स्थापित समितीच्या पदाधिकार्‍यांसह हजारो रामभक्तांव्दारे राबविल्या गेले होते. विशेषतः या अभियानादरम्यान जिल्ह्यातील संत-महंत, आजी-माजी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवरांनी निधी संकलनासंदर्भात विविध माध्यमातून आवाहन केले. पाठोपाठ विविध समाजमाध्यमे, पोष्टर्स, बॅनर्स, स्टीकर्स, आवाहन पत्रके आदी प्रचार साहित्य तसेच गावातील भजनी मंडळे, महिला, वारकरी तसेच रामभक्तांनी दिंडी, गावातून प्रभात फेरी व अऩ्य माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती केली. कारसेवकांचे अनुभव कथनही फेसबुकवरील व्याख्यानमालेच्या युवकांना प्रेरणादायी ठरली. मातृशक्तीन आयोजित केलेल्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित भव्य रांगोळी स्पर्धा आकर्षण ठरली. या विविध उपक्रमांचा परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणावर वातावरण निर्मिती झाली. या नियोजनबध्द अभियानातून परभणी महानगरासह तालुकास्थाने, तसेच ग्रामीण भगातील गावे, वाडी, तांडे व वस्त्यांवरील प्रत्येक कुटूंबापर्यंत रामभक्तांनी या कालावधीत संपर्क केला. भव्य मंदिर निर्माण कार्यासाठी यथायोग्य समर्पनाचे आवाहन केले होते.

हेही वाचा विधायक बातमी : उपक्रमशील शिक्षिका शितल मापारी यांचे योगदान

884 गावांना भेटी

जिल्ह्यात 884 गावे, वाडी, वस्तीवर जावून श्रीराम समर्पण निधी संकलीत केला. मंदिर निर्माणासाठी रामभक्तांनी दोन कोटी 56 लाख 78 हजार 22 रुपये इतका निधी समर्पित केला. निधी हा कुपन व पावतीव्दारे जमा करण्यात आला. तसेच ऑनलाईनच्या माध्यमातून थेट अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणीच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.

255 रामभक्तांचा सहभाग

या निधी संकलनाबरोबर राम मंदिर बांधकामाची माहिती रामसेवकांनी जिल्ह्यात सर्व राम भक्तांपर्यंत पोचवली. नऊ तालुक्यांमध्ये व परभणी शहरामध्ये सामाजिक सदभाव बैठकांमध्ये 46 न्यातींचे (जातींचे) प्रतिनिधींत्व करणारे 255 राम भक्तांचा सहभाग होता. चार महिला मेळावे 434 महिलांच्या उपस्तिथीत पार पडले. जिल्हयात एका समेलनात 48 संत महंतांचा सहभाग हा लक्षणिय ठरला, अशी माहिती श्रीराम जन्मभुमी मंदिर निर्माण निधी संकलन समिती अध्यक्ष अच्युत महाराज दस्तापुरकर यांनी दिली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ,केदार खटिंग, विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत मंत्री अनंत पांडे, प्रल्हादराव कानडे, जिल्हाप्रमुख सुनील रामपूरकर, अभियानप्रमूख गणेश काळबांडे, संतोष देवढे, राजन  माणकेश्वर, चंद्रकांत अल्नुरे, प्रशांत कायंदे, तसेच रा. स्व. संघाचे विभाग कार्यवाह रमेशराव जाधव व जिल्हा कार्यवाह माणिक माटे आणि जिल्हा प्रचारक विकास देशपांडे उपस्थित होते.