Parbhani News: परभणी शहराचा पारा ४४ अंशांवर, मुख्य रस्ते ओस; वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Risks of Heat-Related Illnesses and Vulnerable Groups: परभणी शहराचा पारा ४४ अंशापर्यंत पोचला असून कडक उन्हामुळे नागरिक त्रस्त आहेत. जिल्हा प्रशासनाने उष्माघात टाळण्यासाठी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून सकाळी ८ पासूनच उन्हाच्या झळा असह्य होत आहेत. रविवार व सोमवार असे सलग दोन दिवस पारा ४४ अंशापर्यंत पोचला होता. तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून, सध्या कडक उन्हामुळे नागरिक कमालीचे त्रस्त असून सन बर्न, हीट क्रॅम्प्स (स्नायूंना गोळे येणे), हीट एक्झॉर्शन (प्रचंड थकवा), हीट स्ट्रोक (उष्माघात) यांसारख्या उष्णता विकारांचा धोका वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com