Parbhani News : जिंतूर मतदारसंघात ६५ कोटींची कामे मंजूर ; आ. मेघना बोर्डीकर | Parbhani Jintur Works worth 65 crores constituency Meghna Bordikar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani News

Parbhani News: जिंतूर मतदारसंघात ६५ कोटींची कामे मंजूर ; आ. मेघना बोर्डीकर

Parbhani News : अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिंतूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी तब्बल ६५ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत, अशी माहिती आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यामुळे या कामांना मंजुरी मिळाली असल्याचे सांगून त्यांनी शासनाचे आभार मानले.

मतदार संघातील जिंतूर व सेलू तालुक्यातील रस्ते, पुलांची झालेली दुरवस्था तसेच मोडकळीस आलेली जुनी कार्यालये, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने यांची अवस्था लक्षात घेता आमदार मेघना बोर्डीकर यांनी सदरील कामासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. त्यास आता यश आले.

शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय इमारतीचे बांधकाम, ग्रामीण भागात सावंगी म्हाळसा-इटोली, वस्सा-आसेगाव, चारठाणा पाटी ते कुऱ्हाडी-करंजी, वडी-वाघी- घागरा, धमधम-सावंगी-संक्राळा, केहाळ-सावळी, राज्यमार्ग २ ते पुंगळा, पिंपळगाव गायके ते दुधनगाव, पिंपळगाव काजळे ते अंबरवाडी, प्रमुख जिल्हा मार्ग २ ते हनवतखेडा, जोड रस्ता भुस्कवडी प्रजिमा ८ ते टाकळखोपा, डोनवाडा-बेलखेडा- कोलदंडी, कोठा ते कोठा तांडा,

मारवाडी-गोंधळा-नागठाणा ते प्रजिमा ३३ या रस्त्यांची कामे आणि सेलू तालुक्यात शहरातील दुय्यम निबंध कार्यालय इमारत बांधकाम व ग्रामीण भागात ढेंगळी पिंपळगाव- झोडगाव-देऊळगाव गात-डासाळा या रस्त्यासह रस्त्यावरील दोन पूल, हातनूर-रायपूर-चिकलठाणा रस्त्यावरचा पूल, मोरेगाव-हातनूर, वालूर-बोरी- वस्सा रस्त्यावरील पूल,

जोड रस्ता वलंगवाडी, जोडस्ता डुगरा, जोड रस्ता शिंदे टाकळी, निरवाडी (बु.) ते निरवाडी खुर्द ते रायपूर, राज्यमार्ग २ ते सिंगठाळा, जोडरस्ता कन्हेरवाडी या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.