परभणी : झरी येथे माझा गाव सुंदर उपक्रमाचा शुभारंभ 

अनिल जोशी
Friday, 22 January 2021

ग्रामीण भागातील नागरिकांचे  आरोग्यमान उंचवावे  आणि खेडीपाडी स्वच्छ व सुंदर व्हावीत या हेतूने औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेमधून

झरी ( जिल्हा परभणी) : ग्रामीण भाग स्वच्छतेने स्वयंपूर्ण व्हावा म्हणून औरंगाबाद विभागात सुरू झालेल्या माझा गाव सुंदर गाव या उपक्रमाचा विभागस्तरीय शुभारंभ परभणी जिल्ह्यातील झरी या ग्रामपंचायतीमधून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते करण्यात आला.

ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचवावे आणि खेडीपाडी स्वच्छ व सुंदर व्हावीत या हेतूने औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेमधून ता. 22 जानेवारी ते ता. 20 मार्च या कालावधीमध्ये औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये माझा गाव सुंदर गाव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींचा गौरव देखील करण्यात येणार आहे.

हेही वाचानांदेडच्या सहाय्यक सांख्यिकी अधिकाऱ्याला पोलिस कोठडी; डमी परिक्षार्थी प्रकरण

ता.  22 जानेवारी रोजी या अभियानाचा विभागस्तरीय शुभारंभ परभणी तालुक्यातील झरी या ग्रामपंचायतीमधून करण्यात आला. यावेळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय चौधरी पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बागले, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा कृषी अधिकारी हनुमंत ममदे, उप अभियंता गंगाधर यंबडवार, गट विकास अधिकारी अनुप पाटील, जिल्हा परिषद सदस्य अर्चना देशमुख, गजानन देशमुख, ग्रा. पं. सदस्य दिलीप देशमुख, ग्राम विकास अधिकारी आनंद खरात यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

त्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गावातील नागरिकांशी निराधार पगार, रेशन, घरकुल यादी विषयावर संवाद साधत मंदिर परिसरात स्वच्छता केली तसेच धनगर समाज स्मशानभूमी मध्ये वृक्ष लागवड करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की, गाव विकासामध्ये नागरिकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे त्याशिवाय गावे स्वच्छ होणार नाहीत तसेच गावे जर स्वच्छ व संपन्न बनवायचे असतील तर गावात शौचालय, मुबलक पाणी पुरवठा आणि घरांची उभारणी या त्रिसूत्रीचा समन्वय साधणे खूप महत्त्वाचे आहे.

तसेच लोकांनी प्लास्टिक मुक्तीवर भर द्यावा आणि ज्या व्यक्तींकडे जागा उपलब्ध आहे त्या प्रत्येक व्यक्तीला एमआरजीएस मधून शौचालय उपलब्ध करून देण्याचे तसेच लवकर यांनी पुढाकार घेतला तर गावांमध्ये 50 हजार वृक्ष उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

यावेळी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त सुरेश बेदमुथा यांनी स्वतःच्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने जाणीवपूर्वक काळजीने श्रमदान करण्याचे आवाहन केले.

येथे क्लिक करापरभणी मंडळात 1 हजार 838 कोटी थकबाकी, वसुलीत कसुर करणाऱ्या अधिकाऱ्यावर होणार कारवाई

तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी गावातील महिलांच्या व गावाच्या सन्मानासाठी सगळ्यांनी शौचालयाचा नियमित वापर करण्याचे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वच्छ भारत मिशन कक्षातील संवाद ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केले तर आभार महेश मठपती यांनी मानलेतर  कार्यक्रमाचा समारोप संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पसायदानाने करण्यात आला.

ज्यावेळेस गावातील स्वच्छता करते वेळेस गावामध्ये जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी भोई गल्ली येथील नेमाजी शिरोडकर वय 90 वर्ष यांची आस्थेने विचारपूस केली मुलेबाळे आपल्याला सांभाळतात का आपल्याला व्यवस्थित जेवण देतात का आदी प्रश्नांचा त्यांनी भडिमार केला तसेच बाबुराव कदम यांच्या घरामध्ये थेट जाऊन लाईट विषयी प्रश्न उपस्थित केला लाईट बरोबर राहते आपल्याला काही अडचण आहे का त्यांची अडचण तात्काळ दूर करण्याचे आदेश ग्राम विकास अधिकारी आनंद खरात यांना दिले तसेच गावामधील बच्चाकंपनी ना शाळेमध्ये जाता का गेल्यानंतर गुरुजी आपल्याला शिकवतात का आधी प्रश्नांचाही भडिमार केला व या आपुलकीच्या भावनेमुळे दीपक मुगळीकर यांची गावांमध्ये प्रशंसा होत आहे.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Launch of my village beautiful project at Zari parbhani news