परभणी : लोअर दुधनाच्या पाण्यामुळे परिसर झाला हिरवागार.

अनिल जोशी
Saturday, 5 December 2020

गेल्या दोन वर्षापासून लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी नसल्यामुळे झरी परिसरातील अनेक विहिरी व बोर आटत आले होते.लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या डाव्या कालव्यात ( ता.०२ ) डिसेंबर रोजी पाणी सोडण्यात आले

झरी (जिल्हा परभणी) : लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या डाव्या कालव्याला गेल्या दोन दिवसांपासून पाणी आल्यामुळे झरी परिसर हिरवागार झाला आहे.यावर्षी धरण शंभर भरल्यामुळे धरण सुत्रांनी तिन पाणीपाळ्या जाहिर  केल्यामुळे शेतकऱ्यांनी कापुस उपटून त्या ठिकाणी ज्वारी, हरभरा असे पिक घेतले.या पिकाला लोअर दुधनाच्या पाण्याचा फायदा झाला असून परिसरात हिरवळ वातावरण तयार झाले आहे.

गेल्या दोन वर्षापासून लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी नसल्यामुळे झरी परिसरातील अनेक विहिरी व बोर आटत आले होते.लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या डाव्या कालव्यात ( ता.०२ ) डिसेंबर रोजी पाणी सोडण्यात आले. हे पाणी झरी परिसरात दाखल झाल्यामुळे परिसरातील पाणी पातळीत चांगल्या प्रकारची वाढ निर्माण होणार आहे.त्यामूळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. अनेक विहिरी बोर सद्य:स्थितीला कमी पाण्यामुळे चालत नव्हते. परंतु सदरील धरणात पाणी आल्यामुळे या विहीरी व बोरना चांगल्या प्रकारचे पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पिके तरारली असून परिसरात हिरवळ वातावरण तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोअर दूधना प्रकल्प धरणात सद्य:स्थितीत ९७ टक्के इतक जलसाठा उपलब्ध असून जीवंत साठा द.ल.घ.मी. २३५.११२ इतका आहे.तर डावा कालवा विसर्ग १५४.९८ क्युसेक्स, उजवा कालवा विसर्ग ७२ क्युसेक्स झाला आहे. तसेच बाष्पीभवन व इतर व्यय प्रकल्प अहवालानुसार ३.३० आहे.धरणातील यावर्षीच्या उपलब्ध पाण्यामूळे शेतकर्‍यात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा -  नांदेड : जि. प. ऑनलाईन स्थायी समितीच्या बैठकीस दांडी मारणार्‍या अधिकार्‍यावर कारवाई करणार -

मी माझा 25 एकर मधील कपाशी उपटून त्या ठिकाणी हरभरा व ज्वारी पिक घेतले. कालव्यात पाणी आल्यामुळे माझ्या विहिरीला चांगल्या प्रकारची पाण्याची वाढ झाली.त्यामूळे रब्बीतील पिकांच्या आशा उंचावल्या आहेत.

शेषराव भुसारे, शेतकरी

 मी कोरडवाहू शेतकरी असल्यामुळे ज्वारीस पाणी देणे शक्य नव्हते. परंतु लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या तिन पाणी पाळ्यामुळे मला तिन पाणी मिळणार आहे. माझे ज्वारीच्या पिकाची  चांगल्या प्रकारचे वाढ झाली आहे. ज्वारी पिकावरच माझी संपूर्ण भिस्त आहे.

अंगद काळुंखे, शेतकरी

माझा जिल्हा परिषद सर्कल मध्ये आठ ते दहा गावांना याच्या डाव्या कालव्याचा पाण्याचा फायदा रब्बीसाठी होणार असून अधिकाऱ्याच्या व प्रशासनाच्या नियोजनामुळे पाणी टेन पर्यंत पोहोचण्यास मदत झाली

-अर्चना गजानन गायकवाड, जि प सदस्य झरी

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani: Lower Dudhan water has turned the area green nanded news