परभणी : एमआयडीसी, जुना पेडगाव रस्त्याचे भाग्य उजळणार

कारेगाव रस्त्यावरील उघडा महादेव मंदिर ते एमआयडीसीपर्यंतच्या या रस्त्यावर अनेक वसाहती, शाळा, महाविद्यालये असून जागोजागी रस्ता खचला असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.
परभणी रोड
परभणी रोड

परभणी ः अतिशय दुर्लक्षीत व प्रचंड वर्दळीच्या कारेगाव रस्त्यावरील उघडा महादेव ते एमआयडीसी व जिंतुर रोडवरील (Jintur raod) जुना पेडगाव रस्त्याचे अखेर भाग्य उजळले असून येत्या काही महिण्यांमध्ये मुलभूत सोयी सुविधा विकास निधीतून या दोन्ही डांबरी रस्ते, कॅनॉलवरील पुलासह अन्य दहा कोटीची विकास कामे केली (Devloping work) पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कारेगाव रस्त्यावरील उघडा महादेव मंदिर ते एमआयडीसीपर्यंतच्या या रस्त्यावर अनेक वसाहती, शाळा, महाविद्यालये असून जागोजागी रस्ता खचला असून मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. दुतर्फा नाल्या नसल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे तर नेहमीच सांडपाणी या रस्त्यावर अनेक ठिकाणी साचलेले असते. या भागातील नागरीकांनी रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी अनेक वेळा आंदोलने देखील केली आहेत. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आले आहे.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात कोव्हॅक्सीनपेक्षा कोवीशिल्ड लसीकडे नागरिकांचा कल

विकासकामांच्या निविदा निघाल्या महानगरपालिकेने पाच कोटीच्या विकास कामांसाठी नुकतीच निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. त्यामध्ये उघडा महादेव मंदिर ते एमआयडीसी हा रस्ता व दुतर्फा नाली बांधकामासाठी दोन कोटीची तरतुद करण्यात आली आहे. रिंगरोडने सुंदराईनगरात जाण्यासाठी कॅनॉलवर 60 लाख रुपये खर्चुन पुल टाकला जाणार असून त्यासाठी परिसरातील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. त्याच बरोबर प्रभाग क्रमांक 15 मध्ये विविध वसाहतींमध्ये एक कोटी 55 लाखाचे डांबरी रस्ते, प्रभाग क्रमांक चार मध्ये एमआयडीसी रस्ता, पुल व मंगलमुर्तीनगरात 22 लाखाचा डांबरी रस्ता, प्रभाग क्रमांक नऊ मध्ये 23 लाखाचे रस्ते व सुशोभितीकरण तर प्रभाग क्रमांक आठमधील पावडे गल्लीत 30 लाख रुपये खर्च करुन सिमेंट रस्ता व सुशोभीतीरण केले जाणार आहे. या कामासाठी दोन ते चार महिण्याचा कालावधी लागू शकतो. तर प्रभाग चारमधील आशीर्वादनगर येथे दुर्गा देवी मंदिराजवळ कॅनॉलवर पुल टाकण्यात येणार असून त्यासाठी देखील 60 लाख रुपये खर्च होणार आहे.

जुना पेडगाव रस्त्याचे काम सुरु होणार

प्रभाग क्रमांक दहा मधील सय्यद शहा तुराबुल हक यांच्या दर्ग्याला जोडणाऱ्या जुना पेडगाव रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्था झालेली आहे. प्रचंड वर्दळीच्या या रस्त्याकडे निधीअभावी नेहमीच दुर्लक्ष झाले आहे. नागरी वस्त्या, शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये या रस्त्यावर असून वाहनांची प्रचंड वर्दळ असते. परंतु आता या रस्त्यासह अन्य कामांची निविदा प्रक्रीया पुर्ण झाली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा डांबरी रस्ता व दुतर्फा नाली बांधकामासाठी चार कोटीची तरतुद आहे. तर याच प्रभागात रस्ता व नाली बांधकामावर 40 लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

प्रभाग क्रमांक चार मधून वाहणाऱ्या कॅनॉलवर आशीर्वादनगर व सुंदराईनगर अशा दोन ठिकाणी पुल टाकले जाणार असल्यामुळे तेथील नागरीकांचा जवळून शहरात येणाऱ्याचा मार्ग सुकर झाला आहे. परिसराचा रखडलेला विकास देखील सुरु होणार आहे. तर या परिसरात मोठ्या प्रमाणात प्लॉटींग असून रस्त्यांमुळे जागांच्या किमती देखील वधारणार आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com