
परभणी : सेलूत अवैध धंद्यासह आयपीएल सट्ट्यावर लाखोंची उलाढाल; पोलिस प्रशासन घेतय झोपेचे सोंग
सेलू ( जिल्हा परभणी ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेलूत अवैद्य धंद्यासह आयपीएलवर सट्टा लावण्याचा धंदा जोरात सूरु असून लाखोंची उलाढाल होत आहे. मात्र याप्रकाराकडे सेलू पोलिस प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याची चर्चा सेलूत चांगलीच रंगत आहे.
सांस्कृतीक व शैक्षणिक दृट्या संपन्न असणार्या सेलू शहरात अवैद्य धंदे करणार्यांनी सेलूकरांना चांगलेच घेरले आहे. एकिकडे गेल्या वर्षभरापासून कोरोना संसर्गजन्य रोगामुळे सेलूतील नागरिक त्रस्त आहेत. याचाच फायदा अवैद्य धंदे करणारे घेत आहेत. गेल्या काहि वर्षापुर्वी आयपीएलचा सट्टा लावणार्या बुकी चालकांवर सेलू पोलिस प्रशासनाने चांगलाच अंकुश लावला होता. त्यात अनेकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे आयपीएल बुकी चालकांसह इतर अवैध धंदे करणार्यांचे चांगलेच धाबे दणाणले होते. पुन्हा आयपीएल सट्टा, अवैद्य धंदे बहाद्दारांनी चांगलेच डोके वर काढले आहे.
शहरात सात ते आठ बुकी चालक शहरातील गजबजलेल्या परिसरात आयपीएलचा सट्टा जोरत घेत आहेत. यामध्ये शहरातील नामांकित मंडळीचा समावेश आहे. आयपीएल सट्ट्यामुळे अनेकांची घरे उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. एकिकडे सांस्कृतीक शहरात असे अवैद्य धंदे करणार्यांचे चांगलेच फावत असल्याने सेलूकरांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्याचबरोबर शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस घडत आहेत. जुगार अड्डा, अवैध मार्गाने दारु विक्री, वाळू आदी अवैद्य धंदे जोमाने सुरु आहेत. सेलू पोलिसांकडून दुकानदार, चहावाले, दुधवाले, भाजीपाला विकणार्या गोरगरीबांवर अन्याय होत असल्याने या गोरगरिबांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
तालुक्यासह शहरात कोरोना संसर्गजन्य रोगाने चांगलेच थैमान घातले असून दररोज २५ ते ३० कोरोना रुग्ण सापडत आहेत. मात्र अशाही परिस्थितीत पोलिस प्रशासन अवैध धंदे करणार्यांना मुक संमती देत असल्याने अवैध धंदे करणार्यांची व पोलिस प्रशासनाची चांगलीच मिली भगत असल्याची चर्चा सेलूकरांतून होतांना दिसत आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
Web Title: Parbhani Millions Traded On Ipl Betting With Illegal Trade In Selut The Police Administration Is Pretending To Be
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..