esakal | राजकर्त्यांच्या संवेदना शिल्लक आहेत का? आमदार मेघना बोर्डीकरांचा प्रश्न
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani MLA Meghna Bordikar is on a hunger strike on the issue of farmers.jpg

शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागणीसाठी भाजपच्या जिंतूर येथील आमदार मेघना बोर्डीकर सोमवारपासून उपोषणास बसल्या आहेत.

राजकर्त्यांच्या संवेदना शिल्लक आहेत का? आमदार मेघना बोर्डीकरांचा प्रश्न

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक महिला आमदार उपोषणाला बसली आहे. याची साधी दखल देखील शासन किंवा प्रशासनाने घेतली नाही. राज्यकर्त्यांमध्ये थोड्यातरी संवेदना शिल्लक राहिल्या असतील तर शेतकऱ्यांच्या समस्यांचा विचार राज्यकर्ते करतील असा टोल भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी मंगळवारी लगावला.

हे ही वाचा : परभणी जिल्ह्यात अनधिकृत वीट भट्ट्यांमुळे श्वास घेणेही अवघड 

शेतकऱ्यांना सरसगट आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागणीसाठी भाजपच्या जिंतूर येथील आमदार मेघना बोर्डीकर सोमवारपासून उपोषणास बसल्या आहेत. उपोषणाचा दुसरा दिवस उजाडला तरी राज्यशासन किंवा प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. या संदर्भात मंगळवारी आमदार मेघना बोर्डीकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हे ही वाचा : परभणीत वंचित बालकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करणारा ‘दिवाळी दान महोत्सव’ 

आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या, भाजप पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाला जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा विषय येत्या १० दिवसात संपून टाकू, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. परंतू माझी प्रमुख मागणी असलेल्या सरसकट आर्थिक मदत मिळावी ही आहे. परंतू यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यकर्त्यांमध्ये संवेदना शिल्लक असतील तर ते शेतकऱ्यांच्या मागण्याचा तातडीने विचार करतील, असे मात्र  दिसत नाही. यावेळी माजी आमदार मोहन फड, रामराव वडकुते, जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगराध्यक्ष आनंद भरोसे, प्रमोद वाकोडकर, डॉ. उमेश देशमुख, बाळासाहेब भालेराव, डॉ. विद्या चौधरी, रामकिशन रौंदळे, अभय चाटे, विट्ठलराव रबदडे, सुरेश भुमरे उपस्थित होते. 

परभणीशी सापत्न वागणूक का ?

अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या महसूल मंडळांना पंचनाम्यातून वगळण्यात आले. हाच प्रकार बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांत झाला. परंतू तातडीने बीड जिल्ह्यातील महसूल मंडळांना यादीत समाविष्ठ करण्यात आले. बीडलाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पालकमंत्री आहेत व परभणीला देखील आहे. मग परभणी जिल्ह्याला सापत्न वागणूक का दिली जात आहे? असा प्रश्नही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

पिक कर्ज वाटपासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दुपारी साडेतीन वाजता जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांच्या व्यवस्थापकांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील कर्जवाटपाचा आढावा घेतला जाणार असल्याचीही माहिती आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली.


संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top