esakal | Video : परभणी महापालिकेतर्फे शहर निर्जंतूकीकरणाचे काम सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Parbhani News

परभणी शहरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. शिवाय जागोजागी पोस्टर लावूनही नागरिकांमध्ये कोरोनाविषयीची जनजागृती केली जात आहे.

Video : परभणी महापालिकेतर्फे शहर निर्जंतूकीकरणाचे काम सुरु

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात निर्जूकीकरणाचे काम मंगळवारी (ता.२४ मार्च २०२०) सकाळपासूनच सुरु करण्यात आले. या कामावर स्वतः महापौर व उपमहापौर यांच्यासह आयुक्तही लक्ष ठेवून आहेत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात १४४ कलम लागू केले आहेत. तसेच संपूर्ण जिल्यात संचारबंदी देखील सुरु झाली आहे. यामुळे नागरीकांना रस्त्यावर उतरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी महापालिकेच्यावतीने निर्जंतूकीकरण केले जात आहे. मंगळवारी  सकाळी शहरातील सर्वच भागात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक यासाठी तैनात करण्यात आले आहे.

पोस्टरद्वारे केली जातेय जनजागृती
स्वच्छता निरीक्षकांचे पथक शहरातील विविध भागात फिरून फवारणी करत आहेत. या कामावर लक्ष ठेवण्यासाठी उपमहापौर भगवानराव वाघमारे व रवि सोनकांबळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून या फवारणीची पाहणी करत आहेत. ही फवारणी गेल्या दोन दिवसापासून शहरातील सर्वच भागत सुरु करण्यात आली आहे. महापालिकेच्यावतीने शहरात ठिक - ठिकाणी पोस्टर चिटकवून कोरोना विषाणूपासून स्वतःला कसे वाचवायचे, याची माहिती देवून जनजागृती केली जात आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना देखील या कामासाठी बोलावण्यात आले आहे.

हेही वाचा - जिल्हा बंदीमुळे शेकडो नागरिक अडकले !

नागरीकांनी सहकार्य करावे
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एकमेकांच्या संपर्कातूनच होत असतो. त्यामुळे त्याची साखळी तोडण्यासाठी लोकांनी आपापल्या घरी बसूनच रहावे.  घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे.
- भगवानराव वाघमारे, उपमहापौर, महापालिका परभणी

loading image
go to top