esakal | परभणी : कांदा निर्यात धोरणाला जिल्ह्यात विरोध, संघटना, शेतकरी आक्रमक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी शहरात केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदीच्या विरोधात परभणी कॉँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निदर्शने केली तर मानवत येथे रयत क्रांती संघटनेने प्रशासनाला निवेदन दिले. तसेच बोरी (ता.जिंतूर) येथे शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

परभणी : कांदा निर्यात धोरणाला जिल्ह्यात विरोध, संघटना, शेतकरी आक्रमक

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदीचे धोरण तातडीने मागे घ्यावे, या मागणीसाठी परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीने बुधवारी (ता.१६) छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आमदार सुरेश वरपुडकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. तसेच मानवतला रयत क्रांती संघटनेचे निवेदन दिले तर बोरीत शेतकरी संघटनेने निवेदन दिले.
 
जिल्हा प्रशासनान दिलेल्या निवेदनात कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडी केंद्र सरकारने मागे घ्यावा. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कांद्याचे उत्पादन घेतले. कांद्याला चांगला भावही मिळू लागल्याने चार पैसे शेतकऱ्यांच्या हाती पडतील असे वाटत असतानाच केंद्र सरकारे अचानक निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यांवर घोर अन्याय केला आहे. कांदा उत्पादक  शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी निदर्शने करण्यात आले. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, तालुकाध्यक्ष पंजाबराव देशमुख, माजी सभापती रामभाऊ घाटगे, सोपान कांबळे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
 
हेही वाचाहिंगोली : लॉकडाऊन काळात पाच महिन्यात वीस शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दहा पात्र, आठ प्रलंबित

रयत क्रांती संघटनेचे मानवतला निवेदन

मानवत ः केंद्र शासनाने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने तहसील प्रशासनाला बुधवारी (ता.१६) निवेदनाद्वारे करण्यात आली. केंद्र शासनाने कांदा पिकास जिवनावश्यक वस्तूच्या यादीतून वगळले आहे. यामुळे बाजारपेठेत शासनाने हस्तक्षेप करु नये. हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा १७ सप्टेंबरपासून रयत क्रांती संघटना विविध मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष मधुकर अवचार, तालुकाध्यक्ष  पुरुषोत्तम शिंदे, संतोष अवचार, मधुकर अवचार, महादेव अवचार, दिगंबर शिंदे, रामभाऊ मांडे, मारोतराव अवचार, नारायण अवचार, केशव देशमुख, प्रकाश अवचार, राधाकिसन अवचार, सोपान जाधव, जनार्धन अवचार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

येथे क्लिक करा - परभणी : मंत्री वर्षा गायकवाड यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न, मराठा आरक्षण पेटले -

बोरीत शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन
बोरी ः कांदा निर्यात बंदी हटवण्यात यावी, यासाठी शेतकरी संघटनेचे वतीने बुधवारी (ता.१६) पोलिसांच्या मार्फत पंतप्रधानांना निवेदन पाठविण्यात आले. केंद्र सरकारने बेकायदेशीर लावलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाचा शेतकरी संघटना तीव्र निषेध करत असून सर्वच शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरुपी उठवावी, अशी मागाणी निवेदनात केली आहे. बोरी बसथांबा परिसरापासून पोलिस ठाण्यापर्यंत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढला. निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांच्यासह सय्यद कलीम पटेल, संतोष गबाळे, माधव खरात, मोहसीन काजी, नंदकुमार जिवने, विनायकराव देशमुख, दत्तराव शिंपले, उध्दव डोंबे, राजाभाऊ गोरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन ः राजन मंगरुळकर