esakal | परभणी : जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

सध्या कापूस लागवडीखालील क्षेत्रामधील जवळपास ठिकाणी कपाशीची एक वेचणी झालेली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिण्यात सर्वदुर पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना कपाशीवरील किड व रोगाचे वेलेवर व्यवस्थापन करता आले नाही.

परभणी : जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, कृषी विभागाने सुचविल्या उपाययोजना

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः सध्या कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपाययोजना सुचविलेल्या आहेत.

सध्या कापूस लागवडीखालील क्षेत्रामधील जवळपास ठिकाणी कपाशीची एक वेचणी झालेली आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिण्यात सर्वदुर पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांना कपाशीवरील किड व रोगाचे वेलेवर व्यवस्थापन करता आले नाही. त्यामुळे कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम लक्षात घेता तिचे श्वाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी वेळेवर हंगाम संपविणे गरजेचे आहे. त्या दृष्टीकोनातून सध्य स्थितीत असलेल्या कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी आणि पुढील हंगामातील प्रादुर्भाव टाळण्यासाठी कृषी विभागाने तातडीने व काटेकरपणे उपाययोजना अवलंबिणे गरजेचे असल्याचे म्हटंले आहे.

असे करा गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन

प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या व बोंडे वेचून अळीसह नष्ट कराव्यात, गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी पाच कामगंध सापळे व मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी 25 कामगंध सापळे प्रति हेक्टरी लावावेत, 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अॅझाडिरॅक्टीन 1500 पीपीएम 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी, ट्रायकोग्रामटॉयडीया बॅक्ट्री या परोपजीवी कीटकाने परोपजीग्रस्त अंड्याचे 5 ते 6 कार्ड प्रति हेक्टरी वापरावेत, सायपर मेथ्रीन 25 टक्के इसी 4 मिली किंवा फेनवररेट 20 टक्के इसी 5 मिली किंवा थायमिथॉक्झाम 12.6 अधिक लॅमडा साहेलोथ्रीन 9.5 टक्के 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यातून या रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी.

हेही वाचा -  नांदेड : बीटी कपाशीवर बोंडआळीचा मारा- कापसात सोडली जनावरे -

प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना

कपाशीची फरदड घेऊ नये, वेळेवर कपाशीची वेचनी करून डिसेंबर पर्यत शेतामध्ये कपाशीचे पिक ठेवू नये. हंगाम संपल्यानंतर शेतामध्ये जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. हंगाम संपल्यानवर ताबडतोब पह्राटीचा बंदोबस्त करावा, त्या रचून ठेवू नयेत, श्रेडरच्या सहाय्याने पह्राटीचा बारीक चुरा करून कंपोष्ट खतासाठी उपयोग करावा.

कपाशीचे पिक हंगामाबाहेर न घेता फरदड घेण्याचा मोह टाळावा

यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे शेतकरी कपाशीची फरदड घेवू शकतात. पंरतू थोड्या प्रमाणात होणाऱ्या फायद्यासाठी भविष्यात गुलाबी बोंडअळीचे संकट वाढू शकते. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना कृषी विद्यापीठ तर्फे कपाशीचे पिक हंगामाबाहेर न घेता फरदड घेण्याचा मोह टाळावा.

- संतोष आळसे, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,परभणी

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top