परभणीत रुग्ण आटोक्यात येईनात, आजपासून तीन दिवस संचारबंदीचे आदेश 

गणेश पांडे
गुरुवार, 2 जुलै 2020

जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्ह्यात रात्रीच्या संचारबदीचे आदेश जारी केले आहेत. 

परभणी ः सलग चौथ्या दिवशीही कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने परभणी शहरात तीन दिवसांची कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठेसह बॅंकाच्या वेळेतही बदल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी (ता.दोन) दिले आहेत.

जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशीही कोरोना विषाणु बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी जिल्ह्यात रात्रीच्या संचारबदीचे आदेश जारी केले आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात लोकांनी येवू नये म्हणून सार्वजनिक किंवा खासगी जागेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तीने एकत्र येणे थांबणे, चर्चा करणे, काही कार्यक्रमांचे आयोजन केल्या या विषाणुचा प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील अत्यावश्यक बाबी व व्यावसायिक वगळून संचारबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. परभणी शहर महापालिका हद्द आणि लगतचा पाच किलोमिटर परिसर तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर पंचायत हद्दीमध्ये व त्यालगतच्या तीन किलोमिटर परिसरात गुरुवारी (ता.दोन) च्या मध्यरात्रीपासून रविवारी (ता.पाच) च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

हेही वाचा - शिक्षणसंस्था चालकांवर शाळा सुरु करण्याचा पेच, कसा?

केशकर्तनालयास परवानगी परंतू संचारबंदीनंतर
गेल्या चार महिण्यापासून बंद असलेल्या जिल्ह्यातील केश कर्तनालय व्यावसायिकांना शुक्रवारी (ता.तीन) पासून दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतू, जिल्ह्यात तीन दिवसांची संचारबंदी संपल्यानंतरच या दुकानांना अटी व शर्ती पाळाव्या लागणार आहेत. कोरोना विषाणू संक्रमानानंतर जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउननमध्ये सलून दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. या दुकानांना अटी व शर्तीवर परत परवानगी देण्यात आली आहे. सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत ही दुकाने उघडी राहणार आहेत.

हेही वाचा - मुदखेड सिआरपीएफ केंद्रात शॉपींग कॉम्पलेक्स -

बॅंकाच्या वेळेतही बदल
कोरोना विषाणुचे रुग्ण वाढत असल्याने बॅंकामध्ये गर्दी होऊन या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खासगी, सहकारी बॅंका व इतर वित्तीय सेवा देणाऱ्या आस्थापनाचे कामकाज शुक्रवार (ता.तीन) पासून सकाळी १० ते दुपारी तीन यावेळेत करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बॅंकाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्या संदर्भात सूचना दिल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parbhani patient not detained, curfew ordered for three days from today, parbhani news