esakal | परभणी : मध्यवर्ती बँकांसह कर्मचार्‍यांना लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात.
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरीच्या अनेक घटना मागील काही महिन्यात घडल्या आहेत. कर्मचार्‍यांवर पाळत ठेवून त्यांना लूटण्याचेही प्रकार मागील वर्षात घडला आहे.

परभणी : मध्यवर्ती बँकांसह कर्मचार्‍यांना लुटणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात.

sakal_logo
By
विलास शिंदे

सेलू ( जिल्हा परभणी ) : परभणी व जालना जिल्ह्यात बँकांसह कर्मचार्‍यांना लूटणारी एक टोळीच सेलू पोलिसांनी शनिवारी (ता.०७) रोजी ताब्यात घेतली. या टोळीकडून अनेक गुन्हे उघडकीस येतील. असा अंदाज पोलिस सुत्रांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत चोरीच्या अनेक घटना मागील काही महिन्यात घडल्या आहेत. कर्मचार्‍यांवर पाळत ठेवून त्यांना लूटण्याचेही प्रकार मागील वर्षात घडला आहे. बँकांमधील कर्मचार्‍यांसह ग्राहकांवर लक्ष ठेवून, पाळत ठेवून त्यांना एकटे गाठून मारहाण करीत लूटणे तसेच बँक फोडून बँकेतील तिजोरी नेण्याचा प्रयत्न करणारी टोळी परिसरात कार्यरत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सेलूच्या पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अजयकुमार पांडे यांनी तपास सुरू केला होता. याच दरम्यान बँकेच्या चोरी प्रकरणातील आरोपी कृष्णा भगवान गजमल, सागर डुकरे, आनंद हरिभाऊ वानखेडे, अभिषेक आनंदराव कुलकर्णी यांना पोलिसांनी (ता. ३०) डिसेंबर २०१९ रोजी घडलेल्या डासाळा ( ता.सेलू ) येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचार्‍यांना मोटार सायकलने धडक देऊन खाली पाडत मारहाण करून त्यांच्या जवळील दोन लाख रुपये लुटल्याचे पोलिस चौकशीतून पुढे आले आहे.

हेही वाचा -  हिंगोली : स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इंदूबाई करतात कोरोना वॉर्डात सेवा

या टोळीनेच हा गुन्हा केला असल्याने निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक निरीक्षक अजयकुमार पांडे यांनी या चौघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांकडून बँक फोडीसह लूटीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी व्यक्त केली.दरम्यान, कृष्णा भगवान गजमल व सागर डुकरे हे दोघेजण बँकेवर पाळत ठेवून गुन्हा घडवत असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. नवीन मुलांना हाताशी धरून गुन्हे करण्याची त्यांची प्रवृत्ती असल्याचेही चौकशीतून पुढे आले आहे. तालुक्यातील मध्यवर्ती बँकेसह रोकड नेणार्‍या कर्मचार्‍यांना आडवुण रोकड चोरणारी टोळी पोलीसांनी जेरबंद केली आहे. डासाळा ( ता.सेलू ) येथील मध्यवर्ती बँक लुटुन तेथील ७९ हजार रुपये, तसेच देऊळगाव (गात ) ते डासाळा रस्त्यावर मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी यांना आडवुन रोकड चोरी करुन पळ काढला.

सेलू -वालूर रस्त्यावर मध्यवर्ती बँकेची रोकड नेणार्‍या कर्मचार्‍यास आडवुण रोकड चोरीचा प्रयत्न तसेच मार्केट यार्ड परिसरातील मध्यवर्ती बँकेच्या शहर शाखेत चोरीचा प्रयत्न तसेच शहरातील वाईन शाॅप ची रोकड नेणार्‍या शहरातील रस्त्यात आडवुण चोरीचा प्रयत्न अशा पाच गुन्ह्यात श्रीकृष्ण गजमल, सागर डुकरे, अभिषेक कुलकर्णी, आनंद वानखेडे, सुनिल जिने, विनोद तांबेकर या आरोपींना अटक करुन त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांनी सदरिल गुन्ह्याची कबुली दिली. यामध्ये सहा आरोपी दोन गुन्ह्यामध्ये तर तीन गुन्ह्यामध्ये चार आरोपी आहेत.सदरिल घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय रामोड, पोलीस उपनिरीक्षक संतोष माळगे, पोलीस नाईक विलास सातपुतॆ यांनी लावला. 

१९ लाखाच्या चोरीचा संबंध नाही.

शहरातील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या बंगल्याच्या शेजारी असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या शाखेत तब्बल १९ लाखांची चोरी झाली होती. परंतु सदरिल घटनेतील आरोपींचा या घटनेशी संबंध नसल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांनी दिली.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image