

Parbhani News
esakal
परभणी: अवकाळी पावसाने शहराला चांगलेच झोडपले. नाले तुडुंब भरून वाहिले. काही वेळात पावसाचा जोर कमी झाला आणि महापालिकेचे अस्वच्छतेचे खरे रूप परभणीकरांसमोर आले. नाल्यातील दलदल, घाणी पाणी, कचरा रस्त्यावर साचला. दुर्गंधीचे लोण शहरभर पसरले. नागरिकांना रस्त्याने पायी चालणेही अवघड झाले.
शहरात शनिवारी (ता.चार) पहाटे तीनच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. गावठाण भागासह अन्य वसाहतींमध्ये रस्त्यावर पाण्याचे लोट वाहत होते. नाल्या तुडुंब भरून वाहिल्या. पावसाळासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. गावठाण भागात तर अगोदरच पावसाचे असो की सांडपाणी असो निचऱ्याची समस्या कायम आहे.