
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार आहे. या जनाधाराच्या बळावर पक्षाने जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांसह काही मतदार संघ देखील काबीज केले आहेत
परभणी: एकेकाळी जिल्ह्यात नंबर एक असलेल्या व बहुतांश सत्तास्थाने काबीज केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अंतर्गत संघर्षाने त्रस्त आहे. राज्यपातळीवरून पॅचअप करण्याचे प्रयत्न वेळोवेळी झाले परंतु त्याला फारसे यश आले नाही. परंतु आता आगामी निवडणूका समोर ठेवून अंतर्गत वाद मिटवण्यासाठी मुंबईत प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा जनाधार आहे. या जनाधाराच्या बळावर पक्षाने जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपरिषदांसह काही मतदार संघ देखील काबीज केले आहेत. तसेच जिल्ह्यातील बहुतांश सत्तास्थानांवर देखील राष्ट्रवादीचाच वरचष्मा होता. सन २०१४ च्या विधानसभा निवडणूकीत पक्षाचे दोन विधानसभा सदस्य निवडून आलेले होते. तर सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्ष दुसऱ्या स्थानावर होता.
जिल्हा परिषदेतील वरचष्मा तर कायम आहे. परंतु, काही वर्षापासून पक्षाला अंतर्गत बंडाळीने घेरले आहे. पक्षाची तीन-चार गटात शकले उडालेली आहे. त्यामुळे पक्षाला आहेत ती सत्तास्थाने देखील गमावण्याची वेळ आलेली आहे. गट-तटामुळे राष्ट्रवादी दुभंगली असून त्याचा संघटनात्मक बांधणीवर देखील परिणाम होऊ लागले आहे. पहिल्या महापालिका निवडणूकीत सत्ता काबीज करणाऱ्या राष्ट्रवादीला दुसऱ्या सन २०१८ - १९ च्या निवडणूकीत जेमतेम जागा मिळाल्या व त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले.
अडीच वर्षानंतर झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत आहेत. त्या १८ - १९ नगरसेवकांचे देखील दोन गट झाले. एका गटाने सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठींबा दिला तर दुसऱ्याने विरोधी पक्ष नेता पद घेतले. त्यामुळे पक्षाला या सर्व नगरसेवकांना एकत्र बांधून ठेवता आले नाही. त्यानंतर देखील विविध पदांवरून वाद होतच राहिले. काही वर्षापुर्वी राज्यस्तरावरील नेतेमंडळींनी सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला. परंतु ही सर्व नेतेमंडळी, लोकप्रतिनिधी एकत्र आल्याचे दिसून आलेले नाही.
निवडणुकांपूर्वी एकत्र न आल्यास पक्षाला मोठा फटका
सन २०२२ पासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे. जिल्ह्यात जर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकसंघ राहिला नाही तर त्याचा पक्षाला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. हे ओळखून की काय, पुन्हा एकदा जिल्ह्यातील नेतेमंडळी व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना राज्यपातळीवरुन एकत्र करण्याचे, मन जुळविण्याचे प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र आहे. आगामी महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील नेतेमंडळी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी महापौर प्रताप देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, विरोधी पक्ष नेते विजय जामकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक आदींची या बैठकीस उपस्थिती होती. त्यामध्ये 'पॅचअप' करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.